शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

Amruta Fadanvis: "मध्यवर्गीय माणसाची व्याख्या काय..?", ईडीच्या कारवाईनंतर अमृता फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 14:38 IST

Amruta Fadanvis: ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले होते, त्यावर अमृता फडणवीस यांनी टोला लगावला आहे.

मुंबई: सक्तवसुली संचालनालयाने(ED) शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यावर केलीली कारवाई सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ईडीने गोरेगावमधील पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षां राऊत, गुरू-आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेडचे माजी संचालक प्रवीण राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्याशी संबंधित 11 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यातच संजय राऊत यांनी दिलेल्या एका स्पष्टीकरणावर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृती फडणवीस(Amruta Fadanvis) यांनी टोला लगावला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत म्हणाले होते की, ''कष्टाने कमावलेली संपत्ती ईडीने जप्त केली, ही राजकीय दबावमुळे झालेली कारवाई आहे. माझ्याकडे काहीच संपत्ती नाही, जमिनीचा तुकडा आणि राहते घर याला संपत्ती म्हणत असाल तर संपत्तीची व्याख्याच बदलावी लागेल. माझे 2 रुम किचन एका मराठी माणसाचे घर, एका मध्यमवर्गीय माणसाचे घर आहे. अलिबाग माझे गाव असल्यामुळे 2009 मध्ये तिथे 50 गुंठे जमीन घेतली होती. भ्रष्टाचाराचा एक रुपया, चुकीचा पैसा माझ्या किंवा माझ्या पत्नीच्या खात्यावर आला असेल तर संपूर्ण संपत्ती भाजपाच्या खात्यावर जमा करायला मी तयार आहे," असे संजय राऊत म्हणाले होते.

अमृता फडणवीस यांचा टोला संजय राऊत यांनी स्वत:चा उल्लेख मध्यवर्गीय केल्यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन नाव न घेता संजय राऊतांवर निशाण साधला. "मी खूप गोंधळली आहे, कृपया मला मध्यवर्गीय माणसाची व्याख्या काय आहे सांगा. हीच व्याख्या मध्यमवर्गीय राजकारण्याला लागू होते का?," असे ट्वीट अमृता फडणवीसांनी केले. 

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसSanjay Rautसंजय राऊतEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय