शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Amruta Fadanvis : अमृता फडणवीस संतापल्या, राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाणांना पाठवली अब्रुनुकसानीची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 16:23 IST

Amruta Fadanvis : भाजपच्या आयटीसेल प्रमुखाने रश्मी ठाकरेंवर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली होती.

मुंबई: भाजपच्या आयटीसेल प्रमुखाने रश्मी ठाकरेंवर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली होती. त्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणी अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. अमृता यांनी त्यांच्या ट्विटरवरुन ही माहिती दिली.

विद्या चव्हाण यांना पाठवलेल्या नोटीसचे फोटो ट्विटरवर शेअर करत अमृता फडणवीस यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली. 'आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे राष्ट्रवादीची विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! विद्या चव्हाण मानहानी नोटीस वाच आणि सुधार स्वतःला, मगच मिळेल तुला निर्वाण,'अशा शब्दात अमृता यांनी विद्या चव्हाण यांच्यावर पलटवार केला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणीचे प्रकरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या जितेन गजारिया याने रश्मी ठाकरेंना राबडी देवीची उपमा दिली होती. त्यानंतर शिवसेनेकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यानंतर पोलिसांनी जितेनला अटक केली. जितेन हा भाजपचा आयटी सेलचा प्रमुख असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्या टिप्पणीवरुन राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली होती.  

काय म्हणाल्या विद्या चव्हाण ?'भाजपच्या आयटीसेल प्रमुखाने राबडीदेवीचे उदाहरण दिले असेल तर रश्मी ठाकरे खूप नशीबवान आहेत. ती घरदार, चूलमूल सांभाळणारी संसारिक स्त्री होती. तिला बिहारच्या मुख्यमंत्री होण्याचे भाग्य मिळाले. बरं झाले देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाही. नाही तर ती नुसती डान्सिंग डॉल अशी लोकांची प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरेंची वाईट प्रतिमा नाहीये, असं विद्या चव्हाण म्हणाल्या होत्या.

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना