अमरावती- भरधाव वेगाने जाणा-या कारने चिरडल्याने ३ ठार
By Admin | Updated: July 5, 2014 22:44 IST2014-07-05T12:11:49+5:302014-07-05T22:44:49+5:30
बडनेरा येथे शनिवारी सकाळी एका भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्त्यावर झोपलेल्या १० जणांना चिरडल्याची घटना घडली आहे

अमरावती- भरधाव वेगाने जाणा-या कारने चिरडल्याने ३ ठार
>ऑनलाइन टीम
अमरावती - बडनेरा येथे शनिवारी सकाळी एका भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्त्यावर झोपलेल्या १० जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. त्यातील तिघांचा मृत्यू झाला असून इतर गंभीर जखमी आहेत. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला. बडनेरा स्टेशनजवळील रस्त्याच्या कडेला काही लोक झोपले असता भरधाव वेगाने येणा-या गाडीने त्यांना चिरडले. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. यात तीन जण ठार झाले असून इतरांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी चालकाला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.