अमरावती एक्स्प्रेस रुळांवरून घसरली
By Admin | Updated: October 31, 2014 02:14 IST2014-10-31T02:14:12+5:302014-10-31T02:14:12+5:30
कल्याण स्थानकात अमरावती एक्स्प्रेसच्या इंजिनासह डबा घसरल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली.

अमरावती एक्स्प्रेस रुळांवरून घसरली
मध्य रेल्वे विस्कळीत : कल्याण स्थानकातील घटना
डोंबिवली : कल्याण स्थानकात अमरावती एक्स्प्रेसच्या इंजिनासह डबा घसरल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. गाडीचा वेग कमी असल्याने अपघातात जीवितहानी झाली नसली तरी हजारो चाकरमान्यांसह प्रवाशांचे अतोनात हाल झाले. अपघातामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचे तीनतेरा वाजले. आजच्या घटनेमुळे सर्वाधिक काळ नाशिक-इगतपुरी-कल्याण अप मार्गावरील वाहतूक ठप्प होती.
पहाटे ही गाडी कल्याण फलाट
क्रमांक 4वर येत असतानाच हा अपघात झाल्याने सकाळपासूनच उपनगरीय लोकलसह लांब पल्ल्यांच्या गाडय़ांची वाहतूक विस्कळीत झाली. अखेरीस सकाळी 7.2क् वाजता या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.
या प्रकारातून सावरत असतानाच पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकल्याच्या कारणामुळेही दुपार्पयत या मार्गावरील वाहतूक बंद ठेवली होती. त्यामुळे कल्याण-कसारा मार्गावरील प्रवाशांची तुलनेने जास्त गैरसोय झाली.