Tarkarli Boat Accident: तारकर्ली येथील बोट दुर्घटनेतील दोन मृतांमध्ये पुणे आणि अकोल्यातील पर्यटकांचा समावेश, १८ जण बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 07:11 PM2022-05-24T19:11:09+5:302022-05-24T19:11:45+5:30

Tarkarli Boat Accident: उन्हाळ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन हंगाम सुरू असतानाच आज मालवणमधील तारकर्ली येथे मोठी दुर्घटना घडली. तारकर्ली येथे जय गजानन नावाची २० पर्यटकांना घेऊन जाणारी बोट एमटीडीसी रिसॉर्ट येथे किनाऱ्यावर आणत असताना ही दुर्घटना घडली.

Among the two dead in the boat accident at Tarkarli were 18 tourists from Pune and Akola | Tarkarli Boat Accident: तारकर्ली येथील बोट दुर्घटनेतील दोन मृतांमध्ये पुणे आणि अकोल्यातील पर्यटकांचा समावेश, १८ जण बचावले

Tarkarli Boat Accident: तारकर्ली येथील बोट दुर्घटनेतील दोन मृतांमध्ये पुणे आणि अकोल्यातील पर्यटकांचा समावेश, १८ जण बचावले

googlenewsNext

सिंधुदुर्ग - उन्हाळ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन हंगाम सुरू असतानाच आज मालवणमधील तारकर्ली येथे मोठी दुर्घटना घडली. तारकर्ली येथे जय गजानन नावाची २० पर्यटकांना घेऊन जाणारी बोट एमटीडीसी रिसॉर्ट येथे किनाऱ्यावर आणत असताना ही दुर्घटना घडली. यात दोन जणांचा मृत्‍यू झाला असून, 7 जणांवर ग्रामीण रुग्‍णालय मालवण येथे उपचार सुरु आहेत. तर 11 जणांना प्राथमिक उपचार देवून घरी पाठविण्यात आले, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांपैकी एक जण हा पुण्यातील तर एक जण अकोल्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.

आकाश भास्करराव देशमुख (वय ३०, रा. शास्त्रीनगर, अकोला) आणि डॉ. स्वप्निल मारुती पिसे (वय ४१, आळेफाटा पुणे) अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांची नावं आहेत. तर रश्मी निशेल कासुल (वय ४५, रा. ऐरोली, नवी मुंबई), यांच्यावर रेडकर हॉस्पिटल येथे, संतोष यशवंतराव (वय ३८, बोरिवली, मुंबई), डॉ. अविनाश झांटये हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. तसेच मृणाल मनिष यशवंतराव (वय ८, ग्रंथ मनिष यशवंतराव (वय दीड वर्ष), वियोम संतोष यशवंतराव (वय साडेचार वर्ष सर्व रा. बोरिवली मुंबई.) वैभव रामचंद्र सावंत (वय 40 रा. वायरी तारकर्ली), उदय भावे (वय ४० ऐरोली, नवी मुंबई ) यांच्यावर ग्रामीण रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत.

शुभम गजानन कोरगावकर (वय २२) शुंभागी गजानन कोरगावकर, (वय २६ रा. दोघेही केरवडे, कुडाळ) लैलेश प्रदीप परब (वय३०), अश्विनी लैलेश परब (वय ३० रा. दोघेही कुडाळ). मुग्धा मनीष यशवंतराव (वय ४०) मनीष यशवंतराव (वय ४०) आयुक्ती यशवंतराव (३१ रा. सर्व बोरिवली, मुंबई). सुशांत आण्णासो धुमाळे (वय ३२), गीतांजली धुमाळे (वय २८ रा. दोघेही जयसिंगपूर जि. कोल्‍हापूर). प्रियन संदीप राडे (वय १४ रा. प्रज्ञानंद नगर, पुणे), व सुप्रिया मारुती पिसे (वय ३१ रा. पुणे) यांना प्राथमिक उपचार देवून घरी पाठविण्यात आले आहे. 

Web Title: Among the two dead in the boat accident at Tarkarli were 18 tourists from Pune and Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.