शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

निधीसाठी अमोल मिटकरी कमिशन घेतात, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची जयंत पाटलांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 20:02 IST

वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत येणारे अमोल मिटकरी सध्या कमिशन घेतल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आले आहेत.

अकोला: राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील सदस्य अमोल मिटकरी (Amol Mitkari) या-ना त्या कारणाने चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) काल(दि.28) अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी मूर्तिजापूरमध्ये त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. या आढावा बैठकीत युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्यांनी आमदार अमोल मिटकरी निधीसाठी कमिशन घेतात, असा आरोप केला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.  

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे अमोल मिटकरी सध्या कमिशन घेतल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आले आहेत. अकोला जिल्ह्यात त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी निधीसाठी कमिशन घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. जयंत पाटील यांच्यासमोरच पदाधिकाऱ्यांनी मिटकरींच्या तक्रारींचा पाढा वाचला. त्यासंदर्भातील एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावेळी जयंत पाटलांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

अमोल मिटकरींवर नेमका कोणता आरोप?अमोल मिटकरी यांनी आतापर्यंत जिल्ह्यात 50 कोटींचा निधी आणला, पण पक्षाच्या सदस्यांना विकास कामांसाठी निधी दिला नसल्याचा आरोप होत आहे. तसेच, जिल्हाध्यक्षांना निधी देताना आमदारांनी कमिशन मागितल्याचा आरोपही खुद्द राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापुढे केला आहे. याशिवाय, जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनीही विकास कामांसाठी निधी दिला जात नसल्याची तक्रार प्रदेशाध्यक्षांकडे आढावा बैठकीत केली. 

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस