शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

"पुन्हा थोबाड चालवले, तर कपडे काढून मारणार", अमेय खोपकर यांचा अमोल मिटकरींना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 23:00 IST

Amol Mitkari on Ameya Khopkar : "दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नेत्यांनी पातळी सोडून टीका केल्यास कानाखाली आवाज निघेल."

Amol Mitkari Ameya Khopkar : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) यांच्यातील वाद वाढत चालला आहे. राज ठाकरेंवरील (Raj Thackeray) टीकेमुळे आधी मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची गाडी फोडली. त्यानंतर आता मनसे नेते मिटकरींबाबत आणखी आक्रमक झाले आहेत. दरम्यान, आज मनसेच्या अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी अमोल मिटकरींवर जोरदार निशाणा साधला. तसेच, "अमोल मिटकरींनी पुन्हा थोबाड चालवले, तर कपडे काढून मारणार", असा इशाराही दिला आहे.

सिंधुदूर्गात माध्यमांशी बोलताना अमेय खोपकर म्हणतात, "राज ठाकरे यांच्यावर टीका करणारेअमोल मिटकरी कोण आहेत? त्यांची पात्रता काय आहे? अमोल मिटकरी घासलेट चोर आहेत. ते त्यांच्या गावात आधी घासलेट चोरायचे आणि विकायचे. राज ठाकरेंवर बोलायची त्यांची लायकी नाही. टीका करायची असेल तर करा, मात्र खालच्या पातळीवर जाऊन बोलायचे नाही." 

"पक्षाच्या अध्यक्षांनी टीका केली तर काही नाही, पण दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नेत्यांनी पातळी सोडून टीका केल्यास कानाखाली आवाज निघेल. अजित पवार चोरलेल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. आता यापुढे अमोल मिटकरींनी पुन्हा थोबाड चालवले तर कपडे काढून मारणार. मग आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते दाखल करा", असा इशारा मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिला आहे. 

राज ठाकरेंना मुख्य आरोपी करा, अजित पवार गटाची मागणी  

अमोल मिटकरी यांच्या कारवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करायला लावणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना मुख्य आरोपी करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील केली आहे.  

 

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस