अमिताभ होणार व्याघ्रदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2015 04:48 IST2015-08-11T04:48:57+5:302015-08-11T04:48:57+5:30

महाराष्ट्रातील वन पर्यटनाला चालना देण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी व्याघ्रदूत म्हणून योगदान देण्याचे मान्य केले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बच्चन यांना पत्र लिहून

Amitabh will be the antichrist | अमिताभ होणार व्याघ्रदूत

अमिताभ होणार व्याघ्रदूत

मुंबई : महाराष्ट्रातील वन पर्यटनाला चालना देण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी व्याघ्रदूत म्हणून योगदान देण्याचे मान्य केले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बच्चन यांना पत्र लिहून व्याघ्रदूताची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली होती. नागपूर येथे झालेल्या व्याघ्र संरक्षण फाउंडेशनच्या बैठकीत अमिताभ बच्चन यांना व्याघ्रदूत म्हणून योगदान देण्यासाठी विनंती करण्याचे ठरले होते. त्यानुसार मुनगंटीवार यांनी तसा प्रस्ताव बच्चन यांना पाठविला होता. वनमंत्र्यांचा प्रस्ताव बच्चन यांनी स्वीकारला आहे.

अमिताभ यांची लोकप्रियता व जनमानसात त्यांच्याविषयी असलेला आदरभाव व्याघ्र संवर्धन चळवळीसाठी फलद्रूप ठरेल. - सुधीर मुनगंटीवार

Web Title: Amitabh will be the antichrist