मनसेच्या पदाधिकाऱ्यालाच अमित ठाकरेंची मारहाण?; 'FB लाइव्ह'मधून गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 03:13 PM2024-01-09T15:13:27+5:302024-01-09T15:40:59+5:30

फेसबुक लाईव्ह करून जाधव यांनी राज ठाकरे आणि अमित ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.

Amit Thackeray beat MNS official?; Serious allegations from 'FB Live' by Mahesh Jadhav | मनसेच्या पदाधिकाऱ्यालाच अमित ठाकरेंची मारहाण?; 'FB लाइव्ह'मधून गंभीर आरोप

मनसेच्या पदाधिकाऱ्यालाच अमित ठाकरेंची मारहाण?; 'FB लाइव्ह'मधून गंभीर आरोप

मुंबई - आज आम्ही कामगारांसह अमित ठाकरेंकडे न्याय मागायला गेलो होतो. या माथाडी कामगारांना त्यांच्या हक्काचं काम मिळावं. या लोकांसाठी मी भांडत होतो. परंतु त्यांचा विनय अग्रवाल नावाचा मित्र होता. अमित ठाकरे, राज ठाकरे मला मारायचे तर जीवे मारून टाका पण मी सोडणार नाही. मराठी मराठी करायचे आणि मराठीच्या नावावर मोगलाई करणारे हे थोतांड ठाकरे आहेत. मराठी माणसाचे कैवारी नसून हे व्यापाऱ्यांचे दलाल आहेत. राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा वसुलीबहाद्दर आहे असा आरोप मनसे प्रणित मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केला आहे. 

फेसबुक लाईव्ह करून जाधव यांनी राज ठाकरे आणि अमित ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. यात महेश जाधव म्हणतायेत की, या फेसबुक लाईव्हनंतर माझा खूनदेखील होईल. पण गरिबांना न्याय मिळेपर्यंत मी सोडणार नाही. अमित ठाकरे आणि त्यांच्यासोबतच्या लोकांनी मला बेदम मारलं. कसाबसा जीव वाचवून माथाडी कामगारांनी मला तिकडून पळवून आणले. या लोकांनी मला वाचवलं. राजगडच्या आतमध्ये घुसून मला मारलं आहे. हे नेमकं काय आहे? मागील २० वर्ष मी राज ठाकरेंसोबत घालवली. ते दाखवतात एक आणि करतात एक. राज ठाकरेंचा पक्ष फक्त खंडणीखोर आहे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच पक्षात खंडण्या गोळा करण्यासाठीच अमित ठाकरेंना बसवलं. अमित ठाकरेंच्या माध्यमातून खंडणी गोळा केली जाते त्यासाठी हा पक्ष आहे. आम्ही गरिबांनी कुणाकडे न्याय मागायचा? मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंवर कारवाई करणार का? आज माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. नुसते मराठी माणसांचा कैवारी असल्याचा आव आणायचा. मराठी माणसांच्या लायकीचे नाहीत. हा सगळा खेळ राज ठाकरे आणि त्यांची टीम ऑफ द रेकॉर्ड खंडण्या गोळा करण्याचं संघटन आहे. मराठी कामगार सेना ही माझी स्वतंत्र संघटना आहे. मी कामगारांच्या हितासाठी कधीही तडजोड करणार नाही असं महेश जाधव यांनी व्हिडिओत म्हटलं. 

दरम्यान, माझ्या जीवाचं काही बरे वाईट झाले तर त्यासाठी अमित ठाकरे, राज ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते जबाबदार असतील. खंडणी बहाद्दारांचा हा पक्ष आहे असं जाधव यांनी व्हिडिओच्या शेवटी म्हटलं. 

Web Title: Amit Thackeray beat MNS official?; Serious allegations from 'FB Live' by Mahesh Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.