अमित शहा मातोश्रीचे नव्हे तर गणपतीचे दर्शन घेणार

By Admin | Updated: September 2, 2014 01:55 IST2014-09-02T01:55:17+5:302014-09-02T01:55:17+5:30

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गुरुवारी आपल्या मुंबई दौ:यात काही गणोशोत्सवांना भेटी देणार आहेत.

Amit Shah will take Darshan of Ganpati instead of Matoshree | अमित शहा मातोश्रीचे नव्हे तर गणपतीचे दर्शन घेणार

अमित शहा मातोश्रीचे नव्हे तर गणपतीचे दर्शन घेणार

मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गुरुवारी आपल्या मुंबई दौ:यात काही गणोशोत्सवांना भेटी देणार आहेत. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जाण्याचा त्यांचा कार्यक्रम ठरलेला नाही, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले; तर यापूर्वी मुंबई आल्यावर ‘मातोश्री’वर पायधूळ झाडण्याची अटलजी, आडवाणी व मोदी यांनी पाळलेली प्रथा शहा पाळतील, असा विश्वास शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी व्यक्त केला.
अमित शहा आपल्या मुंबईभेटीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार व राष्ट्रीय सचिव पूनम महाजन यांच्या निवासस्थानांना भेटी देणार आहेत. याखेरीज मुंबईतील काही गणोशोत्सव मंडळांना भेटी देऊन दर्शन घेणार आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले. त्यावर शहा ‘मातोश्री’वर जाणार का, असे विचारले असता उद्धव ठाकरे व शहा यांची भेट जेव्हा व्हायची तेव्हा होईल. शिवसेना-भाजपाची युती कोण कुणाला भेटतो त्यावर नाही, असे फडणवीस म्हणाले. दिल्लीतून भाजपाचे नेते येत होते तेव्हा ‘मातोश्री’च्या नेतृत्वाचा सन्मान करीत होते. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी तसेच नरेंद्र मोदी यांनी आतार्पयत ही परंपरा पाळली आहे. त्यामुळे शहा हेही त्याचेच अनुकरण करतील, अशी अपेक्षा रावते यांनी व्यक्त केली. 

 

Web Title: Amit Shah will take Darshan of Ganpati instead of Matoshree