शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

राज्यात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार, कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी- अंबादास दानवेंची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 19:00 IST

सरकार व्यावसायिकांच्या मागे, सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडल्याचाही केला आरोप

Ambadas Danve: राज्यात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार माजला असून मुंबई, नवी मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून कायदा सुव्यवस्था राखण्यात या सरकारला अपयश आले आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. मुंबई, नवी मुंबईत दलालांचा सुळसुळाट असून हप्तेबाजीखोरांचे जाळ पसरले आहे. शेतकरी, बेरोजगार तरुणांना न्याय देण्यास हे सरकार असक्षम ठरले आहे. नवीन कायद्याबाबत माथाडी कामगार त्रस्त असून आशा सेविका मोबदल्यासाठी टाहो फोडत आहेत. गिरणी कामगार घरासाठी आंदोलन करत असताना त्याकडे या सरकारचे लक्ष जात नाही. बेकायदेशीर काम व धनदांडगे व्यावसायिक यांच्या मागे हे सरकार उभे असून सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडले", अशी आरोपांची मालिकाच अंबादास दानवे यांनी सरकारला सुनावली. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २६० अनव्ये प्रस्तावावर बोलताना त्यांनी हा विरोध नोंदवला.

फक्त घोषणा, शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा

अंबादान दानवे म्हणाले, "राज्यात मंगळवारी रात्री १४ जिल्ह्यात मोठया प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र २४ तास होत असतानाही सरकारने साधे पंचनामे करण्याचे आदेश दिले नाही. जवळपास ४६ हेक्टर जमिनीच नुकसान झालं आहे. सरकार नुसत्या घोषणा आणि घोषणा शिवाय काही करत नाही यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. शेतकऱ्यांची ज्या पद्धतीने अडवणूक पिळवणूक होत आहे ते पाहता दगडाला पाझर फुटेल अशी स्थिती आहे. स्वामिनाथन आयोगाने सुचवलेल्या कोणत्याही सूचनांचे पालन केले जात नाही. कापूस,सोयाबीन, धान, केळी व संत्रा पिकांचे नुकसान होत असताना सरकार शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे न्याय देऊ शकत नाही. कापसाला १ हजारा पेक्षा जास्त भाव मिळत नाही. हमीभावापेक्षा कमी भाव दिला तर गुन्हे दाखल करू या सरकारने केलेल्या वाक्याचा त्यांना विसर पडला आहे."

"सीसीआय केंद्र, कापूस खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना नाइलाजस्तव व्यापाऱ्यांना कापूस द्यावा लागतो.आयात निर्यात धोरणामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती कठीण झाली आहे. मुंबईत ४० रुपये दराने विकला जाणारा कांदा  नाशिक, संभाजी नगर जिल्ह्यात ३ रुपये दराने विकला जातो. इतकी तफावत का? सरकार कोट्यवधी रुपयांचे आकडे जाहीर करते मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे  पोहचत नाही. दुष्काळग्रस्त भागात जनतेला सवलती पोहचत नाहीत. कापसाचा आयात निर्यातीचा धोरण शेतकरी विरोधी आहे. कांदा कापूस निर्यात करणे आवश्यक असताना शेतकऱ्यांचे अंगठे मोडण्याचा काम सरकार करतंय, असा आरोप दानवे यांनी केला. दावोसमध्ये मोठया रोजगाराच्या घोषणा केल्या गेल्या मात्र बेरोजगारीची स्थिती जैसे थे आहे. सारथी बार्टी महाज्योतीच्या परीक्षेचे २ वेळा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही सरकार याची दखल घेणार की नाही", असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.

नोटीफिकेशन मधून सरकारने मराठा समाजाची मोठी फसवणूक केल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला. तसेच मराठा समाजाची लोकसंख्या ३० वरून २८ टक्के कशी झाली असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री व दुसरे मंत्री वेगवेगळी भूमिका मांडतात, एकप्रकारे सरकार मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला. नवी मुंबईचे परिमंडळ २ चे उपायुक्त विवेक पानसरे व पंकज ढहाणे हे मुख्यमंत्री यांच्या पक्षात येण्यासाठी दुसऱ्यांच्या फोनवरून धमक्या देत असल्याची माहिती दानवे यांनी सभागृहात दिली. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, भक्ती कुंभार यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी ही दानवे यांनी ताशेरे ओढले.तलाठी भरती घोटाळा, संभाजी नगर जिल्ह्यात निर्वासितांची २५० एकर मालमत्ता ३ दिवसांत एका व्यक्तीच्या नावे केल्याप्रकरणीचा महसूल विभागातील घोटाळा ही दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणला.

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2024Ambadas Danweyअंबादास दानवेVidhan Parishadविधान परिषदMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारCorruptionभ्रष्टाचार