शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

निलंबन रद्द झाले, तरी परिचारकांना ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 5:54 AM

भाजपा पुरस्कृत विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांचे निलंबन रद्द करण्यात आले असले, तरी त्यांना विधिमंडळात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. हा अभूतपूर्व निर्णय सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मंगळवारी जाहीर करून सभागृहातील कोंडी फोडली.

- अतुल कुलकर्णी मुंबई : भाजपा पुरस्कृत विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांचे निलंबन रद्द करण्यात आले असले, तरी त्यांनाविधिमंडळात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. हा अभूतपूर्व निर्णय सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मंगळवारी जाहीर करून सभागृहातील कोंडी फोडली. सैनिकांच्या पत्नींबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल आ. परिचारक यांना दीड वर्षासाठी निलंबित केले होते. मात्र, सहा महिने बाकी असताना त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. यावरून शिवसेना सदस्यांनी आक्षेप घेत कामकाज रोखून धरले होते.शिवसेना नेते अनिल परब यांनी मागच्या आठवड्यात परिचारक यांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यासंदर्भात प्रस्तावदिला होता. मात्र सभापतींनी तो फेटाळला. त्यामुळे परब यांनी मंगळवारी आ. परिचारक यांच्या बडतर्फीचा दुसरा प्रस्ताव दिला.त्यावर योग्य वेळी निर्णय घेऊ. पण तोपर्यंत परिचारक यांना विधिमंडळात बंदी घातली जाईल, असे सभापतींनी जाहीर केले.एखाद्या विधिमंडळ सदस्याचे निलंबन रद्द केले असेल, तर पुन्हा एका वर्षात दुसºयांदा त्याच्या निलंबनाचा ठराव आणता येत नाही. शिवाय, निलंबनाचा ठराव मांडण्याचा अधिकार फक्त सभापती, सभागृह नेता व संसदीय कार्यमंत्री यांनाच असतो. त्यामुळे परब यांनी दिलेल्या प्रस्तावावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी उशिरापर्यंत सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अध्यक्षहरीभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट आणि अन्य नेत्यांची दीर्घ बैठक झाली. परब यांनीपरिचारक यांच्या बडतर्फीचा ठराव मांडायचा त्यावर सभापती निर्णय जाही करेपर्यंत आ. परिचारक यांना विधिमंडळात प्रवेशबंदी करून सभागृहातील कोंडीफोडण्याचा निर्णय झाला. कोंडी फुटली; विधिमंडळातील कामकाज सुरळीत चंदा कोचर, शिखा शर्मांना समन्स : एसबीआयलाही बोलावणार, पीएनबी घोटाळ्यामुळे केंद्र सरकारच्या अडचणीत भर 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार