शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ग्रंथालये सुरू करण्यास परवानगी द्या : मुख्यमंत्र्यांना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 17:32 IST

अनलॉक-५ मध्ये देखील राज्यातील ग्रंथालयांचा मात्र विचार केलेला नाही, ही गंभीर बाब आहे...

ठळक मुद्देमहाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुढाकार

पुणे : कोरोनामुळे जाहीर झालेल्या टाळेबंदीमुळे मार्च महिन्यापासून राज्यातील सर्व ग्रंथालये बंद आहेत. आता सर्व व्यवहार हळूहळू सुरू होत आहेत. अनलॉक-५ मध्ये हॉटेल्स, फूडमॉल्स, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. राज्यातील ग्रंथालयांचा मात्र विचार केलेला नाही, ही गंभीर बाब आहे. 'ग्रंथालये कधी सुरू होणार ?' याची विचारणा वाचकांकडून सातत्याने होत आहे. शासनाने प्राधान्याने विचार करून ग्रंथालये अटींसह त्वरित सुरू करावीत, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या मागणीचे पत्र पाठवण्यात आले आहे.

ग्रंथालये बंद असल्यामुळे अभ्यासक, संशोधक, वाचक आणि विद्यार्थी यांची गैरसोय होत आहे. ग्रंथविक्रीलाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे प्रकाशक, ग्रंथवितरक आणि विक्रेते तसेच त्यांच्याशी संबंधित सर्वांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नव्या साहित्याच्या प्रकाशनाला आणि विक्रीला अडचणी येत आहेत. साहित्य व्यवहाराच्यादृष्टीने ही बाब हानिकारक आहे. अनेक संपादकांनी आर्थिक तोटा सहन करून दिवाळी अंक काढण्याचा निर्धार केला आहे. दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या कामी ग्रंथालये महत्त्वाची भूमिका बजावत असतात, त्यामुळे ती त्वरित सुरू होणे खूप महत्त्वाचे आहे, याकडे मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी लक्ष वेधले.

या संकटकाळात समाजमनात दाटून आलेले निराशेचे मळभ दूर करण्याचे सामर्थ्य केवळ पुस्तकातच आहे. आजवर पुस्तकांनीच समाजाला भरारी घेण्यासाठी आशेचे पंख दिलेले आहेत. पुस्तके ही जीवनावश्यकच आहेत. मानवी जीवनातील हे ग्रंथांचे मोलाचे स्थान लक्षात घेऊन आणि साहित्य व्यवहाराला उभारी मिळावी यासाठी राज्यातील ग्रंथालये त्वरित सुरू करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली असून, संवेदनशीलतेने विचार करून त्वरित निर्णय घ्याल, आणि ग्रंथालये अटींसह सुरू करण्यास परवानगी द्याल अशी खात्री आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.  

टॅग्स :PuneपुणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारliteratureसाहित्यMaharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषद