शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
5
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
6
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
7
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
8
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
9
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
10
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
11
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
12
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
13
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
14
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
15
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
16
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
17
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
18
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
19
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
20
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला

कथित कॅप्टनने एस.टी बुकिंगच्या बहाण्याने राज्यातील चार आगारांना घातला गंडा, ऑनलाइन पैसे न घेण्याचे महामंडळाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 13:55 IST

क्यूआर कोडद्वारे चार आगारांना गंडविले

सांगली : सायबर गुन्हेगारांनी सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारायला सुरुवात केली असताना आता एसटीलाही दणका दिला आहे. स्वत:ला सैन्यातील कॅप्टन जोरावर सिंग असे म्हणविणाऱ्या भामट्याने एसटी बुकिंग करण्याच्या बहाण्याने राज्यातील चार आगारांना साडेतीन लाखांचा गंडा घातला आहे. त्यामुळे प्रशासनाने या फसवेगिरीपासून सतर्क राहण्याचे आवाहन करणारे परिपत्रक एसटी महामंडळाने जारी केले आहे.परभणी, सोलापूर, नागपूर व चंद्रपूर विभागांत या कथित कॅप्टनने फसवेगिरी केली आहे. सैनिकांसाठी करार तत्त्वावर विशेष बस हवी असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांकडून ऑनलाइन पैसे हडप केलेे आहेत. २० सप्टेंबर रोजी हिंगोली आगारातील वाहतूक निरीक्षकांना त्याने फोन केला. सैनिकांसाठी हिंगोली ते नाशिक बस हवी असल्याचे सांगितले. त्यासाठी मोबाइलवरून पैसे पाठवतो, मात्र तत्पूर्वी तुमच्या खात्यावर किमान ६९ हजार रुपये बॅलन्स आवश्यक असल्याचे सांगितले. सैन्यातील अधिकारी बोलत असल्याने तेथील लिपिकाने जोरावर सिंगने पाठविलेल्या क्यूआर कोडवर चार टप्प्यांत तब्बल १ लाख ३८ हजार ९९७ रुपये पाठविले.दुसऱ्या घटनेत याच व्यक्तीने याचदिवशी सोलापूर आगारालाही गंडविले. सैन्यातील ४३ लोकांना सोलापुरातून खडकी येथे बैठकीसाठी नेण्यासाठी कराराने बस मागितली. सैन्याची कामगिरी असल्याने एक चालक व वाहक तातडीने बस घेऊन अशोक चौकात गेले. तेथे जोरावर सिंग याने पैसे ऑनलाइन भरतो असे सांगत वाहक व चालकाचा क्यूआर कोड व्हाॅट्सॲपवर मागून घेतला. त्यावर प्रारंभी ३० हजार रुपये पाठविले, मात्र नंतर चालकाच्या खात्यावरून ३१ हजार ५९९ व वाहकाच्या खात्यावरून ४ हजार ९९९ रुपये वळते झाल्याचे लक्षात आले.

तिसऱ्या घटनेत २२ सप्टेंबर रोजी नागपूर आगाराला ४४ जणांच्या अमरावतीपर्यंत प्रवासासाठी बस मागितली. त्याचे ४४ हजार रुपये प्रवासभाडे ऑनलाइन भरण्यासाठी क्यूआर कोड व्हाॅट्सॲपवर मागून घेतला. त्याद्वारे आगार व्यवस्थापकाच्या वैयक्तिक खात्यातून ४४ हजार रुपये काढून घेतले. चौथ्या घटनेत २० सप्टेंबर रोजी याच व्यक्तीने चंद्रपूर आगारातून सोनगावला जाण्यासाठी ४५ प्रवाशांसाठी बस मागितली. पैसे ऑनलाइन देण्यासाठी क्यूआर कोड मागून घेतला. त्यावरून १ लाख २३ हजार रुपये काढून घेतले. फसवेगिरीच्या या चारही घटनांत एकूण ३ लाख ४२ हजार ५९६ रुपयांना गंडविण्यात आले आहे. याबाबत स्थानिक पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार देण्यात आली आहे.

दक्षता विभागाने आगारांना केले सतर्कफसवेगिरीच्या या घटनांनंतर एसटीच्या सुरक्षा व दक्षता विभागाने राज्यभरातील आगारांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. एसटी बुकिंगसाठी फक्त महामंडळाच्या खात्यातच पैसे घ्यावेत. वैयक्तिक खात्याचा क्यूआर कोड, एडीपी, पासवर्ड देऊ नये. फसवणूक झाल्यास पोलिसांच्या सायबर सेलला संपर्क करावा किंवा १९३० या क्रमांकावर तक्रार करावी, असे आदेशात म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Captain swindles ST Corporation via booking scam; advisory issued.

Web Summary : A fraudster posing as an army captain cheated Maharashtra State Transport Corporation (ST) out of ₹3.5 lakhs. He targeted four depots using QR codes under the pretext of bus bookings. The corporation has issued an advisory against online payments to individual accounts.