शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर शहरी भाग वगळता सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुरू होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 17:05 IST

लॉकडाऊनपूर्वीच राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये व विवाह नोंदणी कार्यालये बंद करण्यात आली..

ठळक मुद्देकोरोना प्रभावित क्षेत्रात 17 मे नंतरच सुरू होणार दस्त नोंदणीसर्वाधिक महसूल मिळवून देण्यामध्ये राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागांचा मोठा वाटा

पुणे : कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यांपासून बंद असलेली राज्यभरातील दुय्यम निबंधक कार्यालये आता सुरू होत आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड शहर, नागपूर शहर, ठाणे आणि मालेगाव या कोरोनाच्या अतिप्रादुर्भाव असलेला भाग वगळून सर्व ठिकाणची कार्यालये सुरू होणार आहेत. दरम्यान कोरोना प्रभावित क्षेत्रात 17 मे नंतर परिस्थितीचा आढावा घेऊन दुय्यम निबंधक व विवाह नोंदणी कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. राज्य शासनाला उत्पादन शुल्क विभागानंतर सर्वाधिक महसूल मिळवून देण्यामध्ये राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागांचा मोठा वाटा आहे. परंतु राज्यात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्यानंतर लॉकडाऊनपूर्वीच राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये व विवाह नोंदणी कार्यालये बंद करण्यात आली. याचा फार मोठा फटका राज्य शासनाच्या उत्पन्नाला बसला आहे. राज्य शासनाने 3 मे नंतर लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेलता व दारू, वाईनसह सर्व दुकाने हळूहळू सुरू करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये देखील सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. राज्यत सध्या 36 जिल्ह्यापैकी बहुतेक सर्व जिल्ह्यात 90 जिल्ह्यात दुय्यम निबंधक कार्यालये सुरू झाली आहे. मराठवाड्यातील यवतमाळ व परभणी जिल्हात देखील दोन दिवसांत दुय्यम निबंधक कार्यालये सुरू होतील.तर मुंबई, ठाणे सह पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर शहर, मालेगाव हे भाग वगळता ग्रामीण भागातील दस्त नोंदणीचे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच सोबतच कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात देखील उद्या पासून दस्त नोंदणीचे काम सुरू होत असल्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकार