शहापूरमधील सर्व शाळा मोबाइल डिजिटल
By Admin | Updated: April 29, 2016 04:17 IST2016-04-29T04:17:50+5:302016-04-29T04:17:50+5:30
जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील ४६८ शाळांना डीजिटल इंडिया फांऊडेशनमार्फत मोबाईल स्क्रिन मॅग्निफायरचे मोफत वाटप करण्यात आले आहे.

शहापूरमधील सर्व शाळा मोबाइल डिजिटल
ठाणे : जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील ४६८ शाळांना डीजिटल इंडिया फांऊडेशनमार्फत मोबाईल स्क्रिन मॅग्निफायरचे मोफत वाटप करण्यात आले आहे. या अभिनव उपक्रमामुळे तालुक्यातील १०० टक्के शाळा मोबाइल डिजिटल झाल्या आहेत.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्र मांतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थांनाही काळानुरूप शिक्षण देवून त्यांच्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी अधिकाधिक शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न सुरू केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील पष्टेपाडा शाळेचे शिक्षक संदीप गुंड आणि महेंद्र धिमते या दोघांनी राज्यभर डिजिटल शाळेबाबत कार्यशाळा घेतल्या. त्यातच ठाणे जिल्ह्यातील आजही दुर्गम भागात मोठया प्रमाणात विजेच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे शिक्षकांची इच्छा असतानादेखील या समस्येमुळे व निधी अभावी शाळा डिजिटल करण्यात समस्या निर्माण होत आहे. या त्यावर मात करण्यासाठी डीजिटल इंडिया फाउंडेशन काम करीत असून ग्रामीण भागातील शाळांना अत्याधुनिक तांत्रिक साधने उपलब्ध करून शिक्षकांना प्रशिक्षित केले आहे. या शाळांत उपलब्ध साधनांचा वापर करून कमीत कमी खर्चात त्या डीजिटल करण्याच उपक्र म फाउंडेशनने हा उपक्र म हाती घेतला आहे.
या उपक्रमातंर्गत, ग्रामीण भागातील शाळा मोबाइल डिजिटल करण्यासाठी नुकतेच ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी मीना यादव-शेंडकर यांच्या हस्ते ओम गुरु देव कॉलेज आॅफ इंजिनिअरींग येथे सर्व शाळांना मोबाईल स्क्र ीन मॅग्निफायरचे मोफत वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)