सर्वपक्षीय चांगभलं!

By Admin | Updated: May 8, 2015 06:03 IST2015-05-08T06:03:37+5:302015-05-08T06:03:37+5:30

ग्रामीण भागातील आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकीत त्या-त्या जिल्ह्यांतील प्रभावशाली नेत्यांच्या हाती बँकेची सुत्रे आली आहेत.

All-round good | सर्वपक्षीय चांगभलं!

सर्वपक्षीय चांगभलं!

मुंबई : ग्रामीण भागातील आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकीत त्या-त्या जिल्ह्यांतील प्रभावशाली नेत्यांच्या हाती बँकेची सुत्रे आली आहेत. बहुचर्चित बीड जिल्हा बँकेत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्या पॅनलचा दारूण पराभव केला. लोकसभा, विधानसभा आणि वांद्रेतील पोटनिवडणुकीतील पराभावनंतर काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या अंगावर पहिल्यांदाच गुलाल पडला. त्यांनी सिंधुदुर्ग बँकेवर झेंडा फडकावत शिवसेनेच्या पॅनलचा धुव्वा उडवला. सांगलीत राष्ट्रवादीचे जयंत पाटील, जळगावात महसूलमंत्री एकनाथ खडसे, नगरमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात तर मुंबई बँकेवर पूर्वाश्रमीचे मनसे नेते आणि आता भाजपात आलेले प्रविण दरेकर यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मात्र नांदेड जिल्हा बँकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण तर सांगलीत माजीमंत्री पतंगराव कदम यांच्या पॅनलचा पराभव झाला. पुणे जिल्हा बँकेचा निकाल बुधवारीच जाहीर झाला असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पॅनल विजयी झाले आहे.

Web Title: All-round good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.