सर्व जिल्ह्यांत 'आरटीई' आॅनलाइन प्रवेश -राजेंद्र दर्डा
By Admin | Updated: June 19, 2014 02:54 IST2014-06-19T02:54:18+5:302014-06-19T02:54:18+5:30
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षण प्रवेशाची ‘आॅनलाइन’ प्रक्रिया पुणे व मुंबईत यशस्वीपणे राबविण्यात आली

सर्व जिल्ह्यांत 'आरटीई' आॅनलाइन प्रवेश -राजेंद्र दर्डा
पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षण प्रवेशाची ‘आॅनलाइन’ प्रक्रिया पुणे व मुंबईत यशस्वीपणे राबविण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी ही प्रवेश प्रक्रिया ‘आॅनलाइन’ पद्धतीने
केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
‘आरटीई’नुसार इयत्ता पहिलीत वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवल्या जातात. २०१४-१५ या शैक्षणिक वर्षातील या आरक्षित जागांवरील प्रवेशप्रक्रिया पुणे व मुंबईमध्ये आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे खूप सोयीचे झाले. पुढील शैक्षणिक वर्षापासून औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, नाशिक या शहरांसह सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी ही प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने केली जाणार आहे़ पालक केवळ काही मोजक्या शाळांमध्येच आपल्या पाल्याला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असतात. परिणामी, काही शाळांमध्ये प्रवेशासाठी एकही अर्ज आला नाही. त्यामुळे आरक्षित जागा रिक्त राहिल्या, असे दर्डा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)