शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

अलर्ट ! केरळ, कर्नाटक व कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा शक्यता; हवामान विभागाचा इशारा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 06:35 IST

कोकणासह उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात २० ते २२ सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता...

ठळक मुद्देबंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र मध्य महाराष्ट्रातील आटपाडी १४०, माळशिरस १०० तसेच मराठवाड्यातील औसा १३० मिमी पावसाची नोंद

पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र रविवारी तयार होत असून त्याचा परिणाम म्हणून केरळ, कर्नाटक व कोकण किनारपट्टीवर पुढील ३ ते ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकणासह उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात २० ते २२ सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या २४ तासात राज्यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील आटपाडी १४०, माळशिरस १०० मिमी तसेच मराठवाड्यातील औसा १३० मिमी पावसाची नोंद झाली होती.२० सप्टेंबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिजोरदार तर रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. २१ व २२ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, सातारा, परभणी, हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. 

..........

पुणे शहरात पावसाने ओलांडली वर्षाची सरासरी

जूनपासून सातत्याने पडलेल्या पावसाने यंदा परिसरातील सर्व धरणे भरली असून पावसाळ्याच्या चार महिन्यांनी ११ दिवस बाकी असतानाच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. पुणे शहरात पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरी ५६० मिमी पावसाची नोंद होते. तर वर्षभरात साधारण ७४० मिमी पाऊस पडतो. यंदा मात्र १ जूनपासून आजअखेरपर्यंत ७४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामान