अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन लावला विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 03:25 IST2017-07-31T03:25:38+5:302017-07-31T03:25:41+5:30
शहरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिचा सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात सारवडे येथील एका मुलाशी विवाह लावून दिल्याची धक्कादायक घटना

अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन लावला विवाह
लातूर : शहरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिचा सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात सारवडे येथील एका मुलाशी विवाह लावून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात दहा जणांचे रॅकेट असून, त्यांनी यापूर्वीही अल्पवयीन मुलींचा विवाह लावून दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलिसांनी पूनम शहाणे हिच्यासह दहा जणांना अटक केली असून अन्य काहींचा शोध सुरू आहे.
गेल्या महिनाभरापूर्वी शहरातील एक ११ वर्षीय मुलगी शाळेतून दुपारीच हरवल्याची तक्रार तिच्या आईने पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान, मुलीच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला मात्र, ती आढळून आली नाही. आईने एका महिलेवर संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेत चौकशी
केली असता, हा धक्कादायक
प्रकार समोर आला. ‘त्या’ महिलेने वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून हा प्रकार केल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे.