अकोल्यात रासायनिक खताचा अवैध साठा जप्त

By Admin | Updated: July 30, 2015 23:36 IST2015-07-30T23:36:11+5:302015-07-30T23:36:11+5:30

कृषी विभागाच्या भरारी पथकाद्वारे रासायनिक खताचा अवैध साठा जप्त; रासायनिक खताची सुमारे किंमत ४ कोटी २७ लाख रुपये.

Akolatan seized illegal stocks of chemical fertilizers | अकोल्यात रासायनिक खताचा अवैध साठा जप्त

अकोल्यात रासायनिक खताचा अवैध साठा जप्त

अकोला : आकोट रोडवरील गोदामातून खताचा अवैध साठा कृषी अधिकार्‍यांनी बुधवारी जप्त केला. या रासायनिक खताची सुमारे किंमत ४ कोटी २७ लाख रुपये एवढी आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकाद्वारे जिल्हय़ात अवैध खते, बियाणे, कीटकनाशके या संदर्भात चौकशी सुरू असून, आकोट रोडवरील भाड्याने घेतलेल्या गोदामात रासायनिक खताचा अवैध साठा असल्याचा सुगावा लागला. मंगळवारी भरारी पथकाने या गोदामावर छापा टाकला. अवैध खत जप्तीची कारवाई बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती, अशी माहिती जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी गिरीष नानोटी यांनी दिली.

Web Title: Akolatan seized illegal stocks of chemical fertilizers