अकोला अर्बन बँकेच्या अध्यक्षासह संचालकाविरुद्ध फौजदारी !

By Admin | Updated: January 21, 2017 02:50 IST2017-01-21T02:50:02+5:302017-01-21T02:50:02+5:30

अध्यक्ष, संचालक, ऑडिटर्ससह १९ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा.

Akola Urban Bank Chairperson Charges Against Operators! | अकोला अर्बन बँकेच्या अध्यक्षासह संचालकाविरुद्ध फौजदारी !

अकोला अर्बन बँकेच्या अध्यक्षासह संचालकाविरुद्ध फौजदारी !

अकोला, दि. २0- दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेतील ७६ कोटी ४६ लाख रुपयांच्या घोटाळाप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक आणि अंकेक्षकासह १९ जणांविरुद्ध शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अकोला अर्बन मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेचे तत्कालीन अध्यक्ष अतुल भाईलाल गणात्रा, संचालक रमेश खुशालराव देशपांडे, सध्याचे अध्यक्ष शंतनू शरदचंद्र जोशी, संचालक रमेश बालाजी देशपांडे, विमलकुमार नथमल गोयनका, श्रीकांत सूर्यकांत पडगीलवार, विजयकुमार रामकिसन पनपालिया, नरेंद्र हरिहर पाठक, देवकीनंदन सुखदेव पत्रोडिया, रेखादेवी गोपाल खंडेलवाल, कस्तुरी रामेश्‍वर फुंडकर, अरुण लक्ष्मणराव कुळकर्णी, संजीव राधावल्लभ सोमाणी, घनशाम बन्सीलाल ककरानिया, विजय रामचंद्र काबरा, नंदलाल लक्ष्मणलाल सरवरे, दिलीप अंबादास कस्तुरे आणि बँकेचा पदसिद्ध संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी ओ. टी. राठी तसेच रामदासपेठेतील पी. सी. भंडारी अँण्ड कंपनी चार्टर्ड अकाउंटन्ट फर्मचे संचालक पी. सी. भंडारी या १९ जणांनी मिळून संगनमताने आणि कटकारस्थान रचून गत १४ वर्षांच्या कालावधीत अकोला अर्बन बँकेच्या विविध शाखांमध्ये विविध कर्ज प्रकाराच्या नावाखाली तब्बल ७६ कोटी ४६ लाख ७७ हजार ७४८ रुपयांचा घोटाळा केला. यामध्ये ह्यबँक रिकन्सिलिएशनह्णमध्ये ५४ कोटी ५६ लाख, ९८ हजार ७५६ रुपये, छुप्या खात्यांमध्ये १७ कोटी ९७ लाख ८७ हजार २४९ रुपये, चालू खात्यांमधील ह्यओव्हरड्राफ्टह्णमध्ये २ कोटी ३८ लाख ५५ हजार ६८0 रुपये, नागपूर येथील गांधीबाग शाखेत १ कोटी ५ लाख रुपये, अमरावती येथील जयस्तंभ शाखेत ३६ लाख ७२ हजार ९८५ रुपये आणि ह्यलोन सॉफ्टवेअरह्णमध्ये ११ लाख ६३ हजार ७८ रुपयांचा घोटाळा झाल्याचे सहनिबंधकांच्या अहवालात म्हटले आहे. सहनिबंधकांच्या अहवालातील निष्कर्षाच्या आधारे, बँकेच्या अधिकार्‍यांनी घोटाळा केल्याचे ताशेरे अकोला येथील प्रथम श्रेणी न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी यांनी ओढले, तसेच सदर घोटाळा योजनाबद्धरीत्या घडविण्यात आल्याने या प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी १९ आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४0९, ४२0, ४६८, ४७१, १२0 ब, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे यांनी सुरू केला असून, आरोपींना लवकरच अटक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

घोटाळय़ाची 'मोडस ऑपरेंडी'
अकोला अर्बन बँकेतून मूल्य नसलेल्या जागेवर त्यापेक्षा अधिक प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देणे, त्यानंतर काही प्रमाणात रक्कम जमा करून कर्ज खात्यात पैसे भरण्यात येत नसल्याचे कारण समोर करणे आणि नियमांना फाटा देऊन ही जागा कवडीमोल भावात विक्री करणे, या जागा खरेदी-विक्रीच्या प्रक्रियेमध्येही कमिशनखोरी करणे आणि कर्जही माफ करणे, अशा प्रकारच्या ह्यमोडस ऑपरेंडीह्णमधून हा घोटाळा झाल्याची माहिती या प्रकरणाचे तक्रारकर्ते पी. टी. व्यास यांनी दिली.

अकोला अर्बन बँक घोटाळाप्रकरणी १९ जणांविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत असून, लवकरच आरोपींना अटक करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. आरोपींचा शोध घेण्याचे कामकाज पोलिसांनी सुरू केले असून त्यांना लवकरच बेड्या ठोकण्यात येणार आहेत.
अनिल जुमळे
ठाणेदार, सिटी कोतवाली, अकोला.

Web Title: Akola Urban Bank Chairperson Charges Against Operators!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.