अकोला- शेंगाच्या भाजीतून ३ मुलींना विषबाधा
By Admin | Updated: August 26, 2016 14:17 IST2016-08-26T14:17:09+5:302016-08-26T14:17:09+5:30
पोपटखेड येथील तीन मुलींना शेंगाची भाजी खाल्याने विषबाधा झाली.

अकोला- शेंगाच्या भाजीतून ३ मुलींना विषबाधा
> ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २६ - पोपटखेड येथील तीन मुलींनी सकाळी 10 वाजताच्या सुमारास मूगाच्या शेंगांची भाजी खाल्ली. त्यातून त्यांना विषबाधा झाली. या तीनही मुली मैत्रिणी आहेत. भाजी खाल्यानंतर त्यांना उलट्या, मळमळ व्हायला लागली. पोटदुखू लागले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. विषबाधा झालेल्या मुलींची नावे- छकुली उर्फ साक्षी भीमराव बनसोड (14), लक्ष्मी रवी गावंडे (12), आरती तिरतुक उईके(14) आहेत. घटना घडली. त्यावेळी तीनही मुलींचे आईवडिल शेतावर मजुरीसाठी गेले होते.