शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्री असताना शरद पवारांनी महाराष्ट्राला काय दिले?; अमित शाहांचा पुन्हा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 10:39 IST

अकोला मतदारसंघाचे भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते.

मनोज भिवगडेअकोला : दहा वर्षे केंद्रातील मनमोहन सिंग सरकारमध्ये कृषिमंत्री राहिलेले शरद पवार यांनी महाराष्ट्राला काय दिले, याचे उत्तर द्यावे, असे आव्हान देतानाच केंद्रातील भाजप सरकारने दहा वर्षांत महाराष्ट्राला काय दिले, याचा हिशेब सादर करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथील जाहीर सभेत राज्यातील विरोधी पक्षनेत्यांचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे हे पुत्र मोहात अडकले असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.  

अकोला मतदारसंघाचे भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, खासदार भावना गवळी, प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार संजय कुटे, आमदार  अमोल मिटकरी, शिंदेसेनेचे नेते गोपीकिशन बाजोरिया होते. शाह म्हणाले, काँग्रेसच्या काळात राज्याला १ लाख ९१ कोटी रुपये मिळाले होते, त्या तुलनेत गत दहा वर्षांत मोदी यांच्या सरकारने महाराष्ट्राला ७ लाख १५ हजार कोटी रुपये दिले. याशिवाय सिंचन, मूलभूत सुविधा, दळणवळणाच्या सुविधांसाठी कोट्यवधींचा निधीही दिल्याचा हिशेब त्यांनी सादर केला. देशातील संविधान बदलले जाणार नसल्याचा पुनरुच्चार करीत, मोदी यांनी देशातून दहशतवाद व नक्षलवाद संपविण्यासाठी काम केल्याचे सांगितले. 

व्यासपीठावरील २१ मिनिटेशाह यांचे सभास्थळी सायंकाळी ५:४४ वाजता आगमन झाले. व्यासपीठावर येताच त्यांनी भाषणाला सुुरुवात केली. २१ मिनिटांचे त्यांचे भाषण झाले व ते लगेच बंगळुरू येथील ‘रोड शो’मध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले. ते सभा स्थळी येण्यापूर्वी पावसानेही हजेरी लावली होती.

शाह म्हणाले, आम्ही हे दिलेनळगंगा-वैनगंगा नदी जोड प्रकल्पासाठी ७९ हजार कोटी रुपये दिले. त्यातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलढाणा तीन जिल्ह्यात तिन्ही हंगामात चार लाख हेक्टर सिंचनाची व्यवस्था होणार आहे. अकोल्यात ई-बस सेवा, व्हेटरनिटी कॉलेज, बुलढाण्यात मॉडेल कॉलेज सुरू केले. खामगाव- जालना रेल्वे मार्गासाठी ५० टक्के निधी, अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी २१ हजार कोटी, विदर्भ-मराठवाडा निरी प्रोजेक्टकरिता १६० कोटी, १७०० कोटी रुपये वेस्ट प्रोसेसिंग प्रकल्पांकरिता, लोणार सरोवर संवर्धन प्रकल्पासाठी ३७० कोटी, अकोला, अमरावती जिल्ह्यात दोन लाख मातांना उज्ज्वला गॅस सिलिंडर जोडणी, दहा वर्षांत महाराष्ट्राला ७ लाख १५ हजार कोटी रुपये दिले, २ लाख ९० हजार कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी दिले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४akola-pcअकोला