शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ात ४९0 ग्रामपंचायती वीज अटकाव यंत्रांविना

By admin | Updated: June 15, 2014 22:22 IST

५२ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रांमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत वीज अटकाव यंत्र लावण्यात आले आहे.

अकोला: गावात पडणार्‍या विजेपासून होणारी हानी टाळण्यासाठी जिल्हय़ातील ५४२ ग्रामपंचायतींपैकी ५२ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रांमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत वीज अटकाव यंत्र लावण्यात आले आहे.वीज पडून जीवित हानी आणि इतर प्रकारच्या नुकसानीच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. या पृष्ठभूमीवर गावात वीज पडून हानीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सन २0१२-१३ या वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत अकोला जिल्हय़ातील ५२ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात वीज अटकाव यंत्र लावण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत उपविभागामार्फत वीज अटकाव यंत्र बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर, गेल्या एप्रिल २0१३ पासून हे वीज अटकाव यंत्र कार्यान्वित करण्यात आले. जिल्हय़ात एकूण ५४२ ग्रामपंचायती असून, त्यापैकी ५२ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात वीज अटकाव यंत्र बसविण्यात आल्याने या ग्रामपंचायती अंतर्गत गावांना वीज पडण्याच्या धोक्यापासून बचावाची उपाययोजना करण्यात आली; मात्र जिल्हय़ातील उर्वरित ४९0 ग्रामपंचायती अंतर्गत गावांमध्ये वीज अटकाव यंत्र अद्याप लावण्यात आले नाही. त्यामुळे वीज अटकाव यंत्रांविना असलेल्या या गावांना वीज पडल्यानंतर होणार्‍या नुकसानीचा धोका असल्याची स्थिती आहे. त्यानुषंगाने वीज अटकाव यंत्र नसलेल्या गावांमध्ये सदर यंत्र लावण्यासंदर्भात जिल्हा प्रशासना मार्फत काय कार्यवाही केली जाते, याकडे लक्ष्य लागले आहे.