अकोला जिल्हय़ात ४९0 ग्रामपंचायती वीज अटकाव यंत्रांविना

By Admin | Updated: June 15, 2014 22:22 IST2014-06-15T21:37:39+5:302014-06-15T22:22:48+5:30

५२ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रांमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत वीज अटकाव यंत्र लावण्यात आले आहे.

In Akola district without supply of 490 gram panchayatis electricity | अकोला जिल्हय़ात ४९0 ग्रामपंचायती वीज अटकाव यंत्रांविना

अकोला जिल्हय़ात ४९0 ग्रामपंचायती वीज अटकाव यंत्रांविना

अकोला: गावात पडणार्‍या विजेपासून होणारी हानी टाळण्यासाठी जिल्हय़ातील ५४२ ग्रामपंचायतींपैकी ५२ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रांमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत वीज अटकाव यंत्र लावण्यात आले आहे.
वीज पडून जीवित हानी आणि इतर प्रकारच्या नुकसानीच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. या पृष्ठभूमीवर गावात वीज पडून हानीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सन २0१२-१३ या वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत अकोला जिल्हय़ातील ५२ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात वीज अटकाव यंत्र लावण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत उपविभागामार्फत वीज अटकाव यंत्र बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर, गेल्या एप्रिल २0१३ पासून हे वीज अटकाव यंत्र कार्यान्वित करण्यात आले. जिल्हय़ात एकूण ५४२ ग्रामपंचायती असून, त्यापैकी ५२ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात वीज अटकाव यंत्र बसविण्यात आल्याने या ग्रामपंचायती अंतर्गत गावांना वीज पडण्याच्या धोक्यापासून बचावाची उपाययोजना करण्यात आली; मात्र जिल्हय़ातील उर्वरित ४९0 ग्रामपंचायती अंतर्गत गावांमध्ये वीज अटकाव यंत्र अद्याप लावण्यात आले नाही. त्यामुळे वीज अटकाव यंत्रांविना असलेल्या या गावांना वीज पडल्यानंतर होणार्‍या नुकसानीचा धोका असल्याची स्थिती आहे. त्यानुषंगाने वीज अटकाव यंत्र नसलेल्या गावांमध्ये सदर यंत्र लावण्यासंदर्भात जिल्हा प्रशासना मार्फत काय कार्यवाही केली जाते, याकडे लक्ष्य लागले आहे.

Web Title: In Akola district without supply of 490 gram panchayatis electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.