अकोला, बुलडाण्यात अवकाळी पाऊस

By Admin | Updated: February 13, 2017 03:33 IST2017-02-13T03:33:55+5:302017-02-13T03:33:55+5:30

या जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले असून

Akola and Buldhal rain in the rain | अकोला, बुलडाण्यात अवकाळी पाऊस

अकोला, बुलडाण्यात अवकाळी पाऊस

बुलडाणा /अकोला : या जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले असून आंब्याचा मोहोरही गळाला आहे.शनिवारी बुलडाणा जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पाचच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. चिखली, मेहकर, मोताळा, संग्रामपूर, शेगाव या तालुक्यांत पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे हरभरा पिकाचे नुकसान झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Akola and Buldhal rain in the rain