अकोल्यात २५ हजार शेतकरी वंचित

By Admin | Updated: March 30, 2015 02:17 IST2015-03-30T02:17:44+5:302015-03-30T02:17:44+5:30

जिल्ह्यातील २ लाख ८३ हजार ६०६ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपैकी २ लाख ५८ हजार ७७९ शेतकऱ्यांना १२९ कोटी २७ लाख ४५ हजार ३०७ रुपयांच्या मदतीचे वाटप शासनामार्फत

In Akola, 25 thousand farmers are deprived | अकोल्यात २५ हजार शेतकरी वंचित

अकोल्यात २५ हजार शेतकरी वंचित

जिल्ह्यातील २ लाख ८३ हजार ६०६ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपैकी २ लाख ५८ हजार ७७९ शेतकऱ्यांना १२९ कोटी २७ लाख ४५ हजार ३०७ रुपयांच्या मदतीचे वाटप शासनामार्फत २० मार्चपर्यंत करण्यात आले. उर्वरित २४ हजार ८२७ शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक उपलब्ध नसल्याने २० कोटी २४ लाख परत पाठविण्यात आले़
दुष्काळग्रस्तांसाठी ९ जानेवारी रोजी ७५ कोटी आणि ४ फेबु्रवारी रोजी ७५ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला. पैकी १४५ कोटी ९ लाख ६९ हजार ३६ रुपये तहसील कार्यालयस्तरावर वितरीत करण्यात आले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या आणि मदतीच्या रकमेचे धनादेश बँकांमध्ये जमा करण्याचे काम १४ जानेवारीपासून सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील एकूण दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपैकी २ लाख ५८ हजार ७७९ शेतकऱ्यांसाठी १२९ कोटी २७ लाख ४५ हजार ३०७ रुपयांच्या मदतीचे धनादेश २० मार्चपर्यंत बँकांमध्ये जमा करण्यात आले. उर्वरित दुष्काळग्रस्त २४ हजार ८२७ शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक उपलब्ध झाले नसल्याने या शेतकऱ्यांच्या मदतीचा २० कोटी २४ लाख ६१ हजार ४४६ रुपयांचा निधी २० मार्च रोजी शासनाकडे परत पाठविण्यात आला.
बुलडाण्यात ३० टक्के शेतकरी वंचित
बुलडाणा जिल्ह्यात बँक खाते माहितीअभावी ९५ हजार ३६८ शेतकरी शासनाच्या मदतीपासून
वंचित राहिले आहेत़ ३० टक्के निधीचे वाटप
अद्याप झालेले नाही. जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
४ लाख ७६ हजार ८४१ लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसला. या शेतकऱ्यांना २८७ कोटी ९४ लाखांची मदत जाहीर झाली़ पैकी २३९ कोटी ५३ लाखांची मदत प्राप्त झाली. बँकांकडे २१२ कोटी ४० लाखांची रक्कम देण्यात आली. त्यापैकी १६९ कोटी ९२ लाखांची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली.

Web Title: In Akola, 25 thousand farmers are deprived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.