Lok Sabha Election 2019 : अजितराव घोरपडे करणार संजयकाकांचा प्रचार, चर्चेला पूर्णविराम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 18:41 IST2019-03-27T18:23:48+5:302019-03-27T18:41:52+5:30
माजी मंत्री अजितराव घोरपडे हे विद्यमान खासदार भाजपाचे संजयकाका पाटील यांचा प्रचार करणार आहेत.स्वत: अजितराव घोरपडे यांनी ही घोषणा कवठेमहंकाळ येथे केली.

Lok Sabha Election 2019 : अजितराव घोरपडे करणार संजयकाकांचा प्रचार, चर्चेला पूर्णविराम
सांगली : माजी मंत्री अजितराव घोरपडे हे विद्यमान खासदार भाजपाचे संजयकाका पाटील यांचा प्रचार करणार आहेत.स्वत: अजितराव घोरपडे यांनी ही घोषणा कवठेमहंकाळ येथे केली.
कवठेमहांकाळ येथे बुधवारी झालेल्या मेळाव्याच्यानिमित्ताने ते एकाच व्यासपीठावर आले होते.
खासदार संजय काका पाटील यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे. अजितराव घोरपडे हे भाजपामध्ये नाराज होते. ते स्वत: स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढविण्याच्या तयारीत होते,त्यामुळे त्यांची भूमिका महत्वाची ठरणार होती. मात्र भाजपाचा प्रचार करण्याचा त्यांनी आज निर्णय घेतला.
बुधवारी कवठेमहंकाळ येथे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यासोबत भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख होते. यावेळी एकत्र भाजपाचा प्रचार करण्याबाबत त्यांनी चर्चा केली. या मेळाव्यात घोरपडे यांना भाजपचा प्रचार करण्याबाबत मन वळविण्यात भाजपच्या नेत्यांना यश आले.
या निर्णयामुळे अजितराव घोरपडे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.