Ajit Pawar Plane Crash : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघाताची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी मागील काही दिवसांपासून अनेक दावे केले होते. काल रोहित पवार यांनी बारामती येथे डीजीसीआयवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान, आता सोमवारी आणखी काही गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. "येत्या सोमवारी आम्ही या प्रकरणातील नवी माहिती आणि धक्कादायक पुरावे पत्रकार परिषदेत मांडणार आहोत," असा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी ट्विटद्वारे केला आहे. उद्या या दुर्दैवी घटनेला एक महिना पूर्ण होत असून, त्याच दिवशी AAIB चा प्राथमिक अहवाल येणे अपेक्षित आहे.
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विधानाचा संदर्भ दिला आहे. ते म्हणाले, "मुरलीधर मोहोळ यांनी सांगितल्याप्रमाणे उद्या AAIB चा प्राथमिक अहवाल येईल. या अहवालातून सत्य गोष्टी बाहेर येतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. भूतकाळातील इतर घटनांप्रमाणे थातुरमातूर अहवाल देण्याचा प्रयत्न AAIB नक्कीच करणार नाही, ही अपेक्षा, असंही रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
सोमवारी होणार मोठा खुलासा?
"आमच्याकडे काही नवे पुरावे आले आहेत," असे सांगत रोहित पवार यांनी या प्रकरणातील 'सस्पेन्स' वाढवला आहे. यापूर्वीही रोहित पवारांनी विमानाच्या तांत्रिक नोंदी आणि पायलटच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
२८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या या अपघाताला उद्या २८ फेब्रुवारी रोजी एक महिना पूर्ण होत आहे. महिनाभरानंतरही हा अपघात होता की घातपात, यावरून महाराष्ट्रात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यातच रोहित पवारांनी 'पुराव्यांसह' मैदानात उतरण्याची तयारी केल्यामुळे सरकार आणि तपास यंत्रणांवरील दबाव वाढला आहे.
उद्या येणारा प्राथमिक अहवाल आणि सोमवारी रोहित पवार मांडणारे पुरावे याची जोरदार चर्चा सुरू आहे.
Web Summary : Rohit Pawar alleges conspiracy in Ajit Pawar's plane crash, promising explosive evidence. An inquiry is ongoing. AAIB report expected soon.
Web Summary : रोहित पवार ने अजित पवार के विमान हादसे में साजिश का आरोप लगाया, विस्फोटक सबूतों का वादा किया। जांच जारी है। एएआईबी रिपोर्ट जल्द आने वाली है।