शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

मुख्यमंत्र्यांच्या 'भावी सहकारी' वक्तव्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 15:25 IST

Ajit Pawar on Uddhav Thackerays statement: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात भाजपचा भावी सहकारी असा उल्लेख केला आहे.

पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद दौऱ्यावर आलेले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या भाषणावेळी भाजपचा 'भावी सहकारी' असा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवारांना मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर अजित पवार म्हणाले, 'उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी काय बोलावं आणि काय बोलू नये, हे मी कसं ठरवणार? मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे, हे मी कस सांगू शकतो ? माझ्याशी बोलताना तर सरकारचे निर्णय, काय करायचं, राज्य कसं चालवायचं, समस्या काय, याच्याच चर्चा होतात, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

'आपण कशा लोकांसोबत काम करत आहोत, हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं असेल'उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'आजच्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा अन्वयार्थ एवढाच आहे, मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं असेल, कशाप्रकारच्या लोकांसोबत काम करत आहोत. अनैसर्गिक गटबंधनामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतंय, हे त्यांना रिअलाईज झालं असेल. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवली', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आम्ही सक्षम विरोधी पक्षफडणवीस पुढे म्हणाले की, राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. पण, सध्याची परिस्थिती तशी नाही. आम्ही सध्या सक्षम विरोधी पक्ष आहोत. जनतेच्या अपेक्षा घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत. आजच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा अन्वयार्थ एवढाच आहे, मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं, कशाप्रकारच्या लोकांसोबत काम करत आहोत, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस