शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांचा मोठा पुतण्या शरद पवारांच्या भेटीला; मोठे बंधू पुन्हा सक्रीय, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 20:29 IST

पहिल्या शपथविधीवेळी अजित पवारांना पुन्हा आणण्यात श्रीनिवास पवारच महत्वाचा दुवा ठरले होते. अजित पवार कुठे गेले असा शोध राज्यभरात सुरु होता, तेव्हा अजित पवार हे मोठ्या भावाच्याच घरी होते.

महाराष्ट्रात काका-पुतण्याचे राजकारण रंगले असताना पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र येणार की काय अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. पहिल्या पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवार ज्या भावाच्या घरी थांबले होते, त्या भावाचा मुलगा आज शरद पवारांच्या भेटीला आला होता. यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. 

अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार यांनी आज मुंबईत वाय बी सेंटर येथे शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर लगेचच अजित पवार यांना श्रीनिवास पवार यांनी निरोप धाडत घरी बोलवून घेतले. यामुळे शरद पवारांविरोधात बंडाची तलवार उपसणारे अजित पवार पुन्हा माघारी येतात की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. 

अजित पवारांच्या बंडामुळे पवार कुटुंबावर याचा परिणाम दिसू लागला आहे. अजित पवारांनी थेट शरद पवारांच्या वयावर आघात करत त्यांच्या वेळोवेळच्या वागण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने पवार कुटुंबातील दरी वाढू लागली आहे. अशातच आता अजित पवारांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार सक्रीय झाले आहेत. अर्थातच पवार कुटुंबातूनच या हालचाली सुरु झाल्या आहेत. 

पहिल्या शपथविधीवेळी अजित पवारांना पुन्हा आणण्यात श्रीनिवास पवारच महत्वाचा दुवा ठरले होते. अजित पवार कुठे गेले असा शोध राज्यभरात सुरु होता, तेव्हा अजित पवार हे मोठ्या भावाच्याच घरी होते. यावेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी संपर्कात राहत सर्व सुत्रे फिरविली होती. आताची परिस्थिती वेगळी आहे. अजित पवारांनी काकांविरोधात टीका करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे खूपच ताणले जाण्यापेक्षा ते मिटविण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस