शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांच्या निर्णयाने धनंजय मुंडेंना धक्का?; आरोपांच्या चौकशीसाठी समिती गठीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 11:29 IST

शासकीय अधिकाऱ्यांची तीन सदस्यीय समिती गठीत केली असून या समितीकडून चौकशी केली जाणार आहे.

NCP Dhananjay Munde: भाजप आमदार सुरेश धस यांनी मागील काही आठवड्यांत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याचा आरोप केल्यानंतर आमदार धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर पालकमंत्रिपदाच्या काळात बोगस बिले उचलल्याचा आरोप केला. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणीही धस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे विद्यमान पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार आता अजित पवार यांनी याबाबत शासकीय अधिकाऱ्यांची तीन सदस्यीय समिती गठीत केली असून या समितीकडून चौकशी केली जाणार आहे.

आधी महाविकास आघाडी आणि नंतर महायुती सरकारमध्ये धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री असताना अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागातर्गंत काडीचेही काम न करता एकूण ७३ कोटी ३६ लाख रुपयांची बोगस बिले उचलली गेली. २०२१ ते २०२३ या काळात हा गैरप्रकार घडल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता. या प्रकरणाची आता शासकीय समितीकडून चौकशी केली जाणार आहे. अजित पवारांचा हा निर्णय धनंजय मुंडे यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

काय आहे सुरेश धस यांचा आरोप?

३० डिसेंबर २०२१ रोजी  २ कोटी २१ लाख, १० कोटी ९८ लाख, २५ मार्च २०२२ रोजी कार्यकारी अभियंता अंबाजोगाई येथील ६ कोटी ५८ लाख, ३१ मार्च २०२२ रोजी बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता बीड यांच्याकडून १ कोटी ३२ लाख रुपये बिलापोटी उचलण्यात आले. परळीतील संजय मुंडे हे उपअभियंता असताना, त्यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदभार दाखवून २५ जून २०२२ रोजी एकाच दिवशी ३७ कोटी ७० लाख रुपये उचलण्यात आले. 

रद्द केलेल्या कामांचेही १४ कोटी रुपये उचलले२५ मार्च २०२० रोजी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत असलेल्या ५७ कामांच्या प्रशासकीय मान्यता तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केल्या होत्या. परंतु अंबाजोगाई बांधकाम विभागांतर्गत असलेल्या या रद्द कामांची १४ कोटी ४३ लाखांची बिले उचलण्यात आली, असा आरोपही धस यांनी नुकताच पत्रकार परिषदेत केला. 

सुरेश धस यांचा सनसनाटी आरोप सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई अंतर्गत रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम २०२१-२२ साठी ९ कामांसाठी १५ कोटी, १८ फेब्रुवारी २०२२ रोजी १ कोटी २० लाख व १६ कोटी २० लाख रुपये काम न करता उचलले.  अर्थसंकल्पीय हॅम अर्थात हायब्रीड अन्युटी अंतर्गत ६९ कोटी रुपयांचे रस्ता काम सुरू असताना, ६ कोटी रुपये मंजूर करून आणले. तसेच, परळी पूस-बर्दापूर कामासाठी ५ कोटी रुपये उचलले.  या कामांची क्षेत्रीय कार्यालयाने पाहणी केली असता या कामांवर डबल पैसे उचलल्याचे लक्षात आले. ही बाब क्षेत्रीय कार्यालयाने कळवली असताना सुद्धा कोणतीच कारवाई झाली नाही, असेही धस म्हणाले होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSuresh Dhasसुरेश धसbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीड