शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 07:17 IST

Ajit pawar Vs Supriya Sule: शरद पवारांचा मुलगा नाही, म्हणून मला संधी नाही : अजित पवार; सुळे म्हणाल्या, अजून काय द्यायचे राहिले? तुलना करा...

लोकमत न्यूज नेटवर्कशेलपिंपळगाव (पुणे) : पवार कुटुंबात अनेकदा चर्चेत असलेला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. 'आदरणीय शरद पवार आमचे नेते आहेत; मात्र वयानुसार त्यांनी थांबले पाहिजे, असे सांगतानाच 'मी त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी नाही,' असाही टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरसभेत शरद पवार यांना लगावला.

केंदूर (ता. शिरूर) येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, 'शरद पवार साहेब आमचे नेते आहेत. मात्र, वयाच्या ऐंशीनंतर त्यांनी थांबलं पाहिजे. स्वतःची तब्येत सांभाळली पाहिजे. कारण, आम्ही कारभार करायला खंबीर आहोत. त्यासाठी आमच्यासारख्या काम करणाऱ्या नेत्यांच्या हातात पक्षाची सूत्रे देऊन पवार साहेबांनी मार्गदर्शन करून आशीर्वाद देणे अपेक्षित होते; परंतु साहेबांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेतला. आता माझंही वय होत आलंय. मला काही तरी चांगलं काम करून दाखवायचे असून, पुतणे म्हणून मते घ्यायची नाहीत. विकासकामे करायची असतील, तर मोदींचे हात बळकट करावे लागणार आहेत.'

'अमोल कोल्हे यांना तिकीट दिले, ही माझी चूक'ओतूर : 'पाच वर्षांपूर्वी मी तुम्हाला न विचारता अमोल कोल्हे यांना तिकीट दिले, ही माझी चूक झाली. जुन्नर तालुक्याचे सुपुत्र म्हणून उमेदवारी देण्याचा मी अभ्यास केला. लगेच जाहीर केले; पण नंतर पाच वर्षांमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आपला कारभार केला, कधी माझ्या आदिवासी भागात आले नाहीत, कधी कुणाला भेटले नाहीत. कारण, स्वतः सेलिब्रिटीमध्ये रस होता. माझ्या राजकीय जीवनामध्ये त्यांना तिकीट दिले, ही माझी चूक झाली आहे, ती चूक सुधारा,' असे अजित पवार यांनी ओतूर येथील सभेत केले.

'तुम्हीच तुलना करा कोणाला काय मिळाले'मंचर (पुणे) : 'अजित पवार यांचा स्वभाव मला माहीत आहे. तुम्हीच तुलना करा, की कोणाला काय मिळालं. मला काय मिळालं आणि दादांना काय- काय मिळालं. सगळं तुमच्या समोर आहे,' या शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

त्या म्हणाल्या, 'नाती जोडायला ताकद लागते. पक्ष फुटला, चोरले हे जे काही सुरू आहे. ते चुकीचे आहे. प्रेमाने मागितले असते, तर सर्व दिलं असतं. त्यामुळं मंत्रिपद महत्त्वाचं की निष्ठा महत्त्वाची,' असा सवाल उपस्थित केला. शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.अजून काय द्यायचे राहिले? शरद पवार यांनी अजितदादांना अनेक पदे दिली. पहाटेचा शपथविधी घेऊन आल्यानंतरही त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री केले. यापेक्षा अजून काय द्यायचे राहिले आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी छत्रपती संभाजीनगर येथे व्यक्त केले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४