शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

"आधी गोट्या खेळत होतात का?"; जितेंद्र आव्हाडांना 'दुहेरी धक्का' दिल्यावर अजितदादांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 21:17 IST

Ajit Pawar Jitendra Awhad: दोन विश्वासू शिलेदारांनी सोडली आव्हाडांची साथ, ठाणे आणि मुंब्रा येथील शेकडो युवकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश

Ajit Pawar Jitendra Awhad: अभिजीत पवार राष्ट्रवादी पक्षात येत असताना त्याला काहींचे कॉल येत होते तू कुठे आहेस? आपण बसू, मार्ग काढू, अरे आता कधी मार्ग काढणार? अगोदर काय गोट्या खेळत होतात का? असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता लगावला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीतील विविध पक्षांत 'इनकमिंग' सुरुच आहे. आज जितेंद्र आव्हाड यांचे दोन विश्वासू शिलेदार अजितदादा गटात आले. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.

एका माणसामुळे अनेक जण सोडून गेले...

"ठाणे जिल्ह्यातील अनेक लोक, मान्यवर राष्ट्रवादीत होते. ते एका माणसामुळे पक्ष सोडून गेले. का सोडून गेले, याचे आत्मपरीक्षण त्यावेळी कुणीच केले नाही. त्यावेळी ती करण्याची आवश्यकता होती. माणूस काम करतो, तो चुकतो मात्र एखाद्याने मुद्दाम चुका केल्या तर कोण सोबत शिल्लक राहणार नाही," असे अजित पवारांनी ठणकावून सांगितले.

नव्यांचा सन्मान, जुन्यांचा मान

"नेता व पक्ष यांना व्हिजन हवे आणि सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन जायचे असते आणि तशा पध्दतीने आपला पक्ष काम करत आहे. राष्ट्रवादीची ताकद पक्षात येणाऱ्या अशा लोकांच्यामुळे वाढत असते. आपण बेरजेचे राजकारण करत आहोत. पक्षात नवीन आलेल्यांचा सन्मान केला जाईल आणि जुन्यांचाही मान राखला जाईल," असा शब्दही अजितदादांनी यावेळी दिला.

जितेंद्र आव्हाडांना दुहेरी दणका

जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय्य सहाय्यक आणि शप गटाचे प्रदेश उपाध्यक्ष अभिजीत पवार आणि प्रदेश सरचिटणीस हेमंत वाणी यांच्यासह ठाणे शहर आणि मुंब्रा येथील शेकडो युवक कार्यकर्त्यांनी आज अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. महिला विकास मंडळ सभागृहात हा प्रवेश झाला. या दोन शिलेदारांचा पक्षप्रवेश हा जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का मानला जात आहे. अभितीत पवार आणि हेमंत वाणी हे जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत विश्वासू आणि कट्टर समर्थक म्हणून परिचित आहेत. त्यांच्या प्रवेशाने ठाणे शहर व मुंब्रा येथील आव्हाडांच्या संघटनेला खिंडार पडल्याची कुजबूज आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारJitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे