शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांना पश्चाताप, शिंदे यांच्या विसर्जनानंतर...; विनायक राऊतांचे धक्कादायक दावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 19:56 IST

अजित पवार कौटुंबीक कार्यक्रमांना जात आहेत, परंतू सरकारच्या कोणत्याही बैठकीला किंवा दौऱ्याला जात नाहीएत.

अजित पवार गेल्या महिन्यापासून सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. परंतू, त्यांनी दिवाळीत दिल्ली गाठत गृहमंत्री अमित शाहा यांनी भेट घेतली होती. तरी देखील अजित पवार कौटुंबीक कार्यक्रमांना जात आहेत, परंतू सरकारच्या कोणत्याही बैठकीला किंवा दौऱ्याला जात नाहीएत. यावरून ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी महायुतीतील वादावर, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर मोठे दावे केले आहेत. 

अजित पवार यांना आता पश्चाताप झाला आहे. यातून मुक्त कसे व्हावे याचा ते विचार करत असल्याचे विनायक राऊत म्हणाले. याचबरोबर अजित पवार हे स्पष्टवक्ते आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेला खरा वाव देण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले होते. परंतू, आता तशी परिस्थिती राहिलेी नाही. प्रत्येक गोष्टीत अजित पवारांची गळचेपी केली जात आहे. गेल्या आठवड्यातील अमित शहांच्या भेटीत शिंदे यांच्या विसर्जनानंतर आपल्याला मुख्यमंत्री करावे, अशी मागणी अजितदादांनी केली असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. 

डिसेंबर महिन्यात महायुतीमध्ये मोठा स्फोट होणार असल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे. तीन तिघाडा काम बिघाडा अशी आपल्याकडे म्हण आहे. फक्त ईडीच्या कारवाईच्या दबावामुळे शिंदे गट आणि अजित पवार गट सत्तेत सहभागी झाले आहेत. ते त्यांच्यात मिसळलेले नाहीएत. भाजपाची हाव खूप मोठी असल्याने आपलंच घोडे रेटण्याचे काम होणार आहे. यामुळे ३१ डिसेंबरपूर्वीच महायुतीत मोठा स्फोट होणार असल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. 

अकोला प्रकाश आंबेडकरांसाठी राखीव...अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर निवडून येतील अशी शंभर टक्के खात्री आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ती जागा राखीव ठेवण्यास हरकत नाही, असा विचार महाविकास आघाडीत सुरु आहे. जिंकलेल्या जागांपेक्षा एखाद्या जागी मेरिटवर चांगला उमेदवार असेल तर ती जागा मित्रपक्षांना सोडण्यास हरकत नसावी, हा विचार तिन्ही पक्षांना पटल्याचे राऊत म्हणाले.  

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Eknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारBJPभाजपा