शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

"साहेब म्हणजेच पार्टी, पण त्यांचा निर्णय झालाय... भावनिक होऊ नका"; अजितदादांनी समजावलं-दटावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 15:23 IST

अजित पवार यांनी कार्यकर्त्यांपुढे वेगळी भूमिका मांडली.  

मुंबई :  मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या "लोक माझे सांगाती" या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करताना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. यानंतर सभागृहात उपस्थित कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. "साहेब तुम्ही अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय मागे घ्या", अशी विनंती करत कार्यकर्त्यांनी मोठ्यामोठ्याने घोषणा दिल्या. मात्र, यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांपुढे वेगळी भूमिका मांडली.  

अजित पवार म्हणाले, "पवार साहेब अध्यक्ष नाही म्हणजे पक्षातच नाही, असा अर्थ होत नाही. पवार साहेबांच्या वयाचा विचार करता साहेबांशी आणि सगळ्यांशी चर्चा करून नव्या नेतृत्वाकडे ही जबाबदारी दिली जातेय. हे नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टीचे काम करेल. शेवटी साहेब म्हणजेच पार्टी हे कुणी सांगायची गरज नाही.आता पवार साहेबांनी तो निर्णय घेतला आहे, ते जनतेचं ऐकत असतात. वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहेत. जो अध्यक्ष होईल तो पवार साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली काम करेल." 

याचबरोबर, "देशभरात मीटिंग करणे, लोकांना भेटणे सुरू राहिलं. कुणी पण अध्यक्ष झालं प्रांताध्यक्ष झालं तरी पवार साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली पार्टी चालणार आहे. हा निर्णय कालच होणार होता मात्र काल 1 मे असल्यामुळे निर्णय जाहीर केला नाही. आज ना उद्या हा निर्णय होणार होता. काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात. कुणीही अध्यक्ष झालं तर साहेबांच्या जीवावरच राष्ट्रवादी पक्ष चालणार आहे, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. साहेबांच्या डोळ्यादेखत नवीन होणारा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको रे... नव्या अध्यक्षाला राजकारणातले बारकावे सांगतील ना...आपण साहेबांनी हाक दिल्यावर येणारच...खासदारकी आमदारकी बाबत सर्व निर्णय तेच घेतील.", अशा शब्दांत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना समजावले.

सुप्रिया तू बोलू नको, अजित पवारांनी दटावलं  अजित पवारांचं बोलून झाल्यानंतर कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळे यांना बोलण्याची विनंती केली. सुप्रिया सुळेही समोर बसून सर्व पाहात होत्या. मात्र त्याचवेळी अजित पवार यांनी तू बोलू नकोस, मोठा भाऊ म्हणून अधिकार वाणीने सांगतोय, असे सुप्रिया सुळेंना सांगितले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रSupriya Suleसुप्रिया सुळे