शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आकाशात दोन घिरट्या, तीन वेळा आलटी-पालटी अन् विमान कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 07:42 IST

Ajit pawar Plane Crash: वेळ सकाळची. नेहमीप्रमाणे घराच्या बाजूला कामे सुरू होती. त्यावेळी अचानक एक विमान आकाशात घिरट्या घालताना दिसले. थोड्या वेळात पुन्हा त्याच विमानाने घिरटी घातली. पण, यावेळी घिरटी घालत असताना हवेतच त्याने दोन-तीन वेळा आलटी-पलटी घेतली अन् क्षणार्धात आमच्या घराच्या जवळच असलेल्या शेतात कोसळले...

बारामती - वेळ सकाळची. नेहमीप्रमाणे घराच्या बाजूला कामे सुरू होती. त्यावेळी अचानक एक विमान आकाशात घिरट्या घालताना दिसले. थोड्या वेळात पुन्हा त्याच विमानाने घिरटी घातली. पण, यावेळी घिरटी घालत असताना हवेतच त्याने दोन-तीन वेळा आलटी-पलटी घेतली अन् क्षणार्धात आमच्या घराच्या जवळच असलेल्या शेतात कोसळले, अशी माहिती गोजुबावी (ता. बारामती) येथील प्रत्यक्षदर्शी अतुल आटोळे व अनिता आटोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

गोजुबावीचे माजी सरपंच राघू आटोळे यांचे विमानतळानजीक शेतात घर आहे. अनिता आटोळे यांचा मुलगा आर्यन, दीर अतुल आटोळे गायीच्या गोठ्यात काम करीत असताना सकाळी ८:३०च्या सुमारास विमान आकाशात घिरटी घेताना दिसले. नंतर दुसऱ्या वेळी ८:४५ वा. दरम्यान विमान गोजुबावी हद्दीतील मंदिराच्या उंचीइतके खाली आले. परंतु, वैमानिकाला ते विमान पुन्हा धावपट्टीवर आणता आले नाही. विमान वेगात खाली येताना आकाशात दोन-तीन वेळा आलटी-पलटी झाले. त्यानंतर विमान वस्तीच्या बाजूला दगडावर कोसळले. सुरुवातीला एक छोटा स्फोट झाला, नंतर मोठा, असे दोन स्फोट झाले. यात विमानाने पेट घेतला.

माझा मुलगा आर्यन, दीर अतुल आम्ही मदतीसाठी धावलो. परंतु, उशीर झाला होता. विमानातील सर्व प्रवासी बाहेर फेकले गेले होते. सुरुवातीला शिकाऊ विमान असेल, असा आमचा समज झाला, परंतु विमानतळावर अजितदादांच्या स्वागतासाठी आलेले कार्यकर्ते लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी विमानात उपमुख्यमंत्री अजितदादा असल्याचे समजले. महाराष्ट्रातील जनतेच्या व बारामतीच्या लाडक्या दादांना आम्ही शेवटची मदत पोहोचवू शकलो नसल्याची खंत प्रत्यक्षदर्शी अनिता व अतुल आटोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

सकाळी जनावरांना चारा टाकायला बाहेर आलो. विमानाने २ घिरट्या घातल्या. विमान हेलकावे घेत होते. ८:४५ वाजता स्फोटाचा प्रचंड आवाज झाला. हा आवाज आजूबाजूच्या १० किमीच्या परिसरापर्यंत गेला असेल. जाळ खूप उंच होता. धूर आणि आगीमुळे आम्हाला ५० फूट मागेच थांबावे लागले.- राघू मारोती आटोळे, गोजुबावी गावचे रहिवासी

सकाळी मी धुणं-भांडे करत होती. जोराचा आवाज करत अचानक विमान खाली आले आणि क्षणात स्फोट झाला. आमच्या घरापर्यंत विमानाचे पार्ट उडून आले. आम्ही आवाज आणि जाळ बघून घाबरून गेलो.- उर्मिला आटोळे, प्रत्यक्षदर्शी

English
हिंदी सारांश
Web Title : Plane Crashes After Two Circles, Three Tilts in Sky

Web Summary : A plane crashed near Baramati after circling and tilting mid-air. Residents reported seeing the aircraft descend rapidly before a loud explosion. Initially mistaken for a training flight, witnesses later learned Deputy Chief Minister Ajit Pawar was potentially on board. Locals expressed regret at being unable to help.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाBaramatiबारामतीPuneपुणे