Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमानअपघातात दुःखद निधन झाले. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी ते खासगी विमानाने मुंबईहून बारामतीकडे येत असताना, हा अपघात झाला. बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान पायलटला रनवे स्पष्ट न दिसल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेनंतर खासगी चार्टर्ड विमाने (प्रायव्हेट जेट) पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.
भारतामध्ये प्रायव्हेट जेटचा वाढता वापर
गेल्या काही वर्षांत भारतात प्रायव्हेट जेट्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. व्यवसायिकांची वाढती मागणी, वेळेची बचत आणि निवडणूक काळात राजकीय नेत्यांकडून होणारा वापर ही यामागची प्रमुख कारणे मानली जातात. देशात दरवर्षी सरासरी 7 नवीन प्रायव्हेट जेट्स परिचालनात येतात.
प्रायव्हेट जेट उद्योग किती मोठा?
Indulge Globalच्या माहितीनुसार, सध्या भारतात 168 प्रायव्हेट जेट्स आहेत. 2016 मध्ये ही संख्या 144 होती. म्हणजेच 8 वर्षांत 54 जेट्सची वाढ झाली आहे. किरायाने चालणाऱ्या चार्टर्ड विमानांचा समावेश केल्यास, देशातील एकूण संख्या 400 हून अधिक होते. तर, 2016 मध्ये ही संख्या 328 होती.
SBS Aviationनुसार, 2024 मध्ये भारतातील चार्टर्ड विमानांचा एकूण व्यवसाय 274 दशलक्ष डॉलर (सुमारे 25 अब्ज रुपये) इतका होता. तर, 2029 पर्यंत हा व्यवसाय दुप्पट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बहुतेक प्रायव्हेट जेट्स उद्योजकांकडे असून, निवडणूक काळात राजकीय नेते तसेच धार्मिक स्थळांच्या प्रवासासाठीही यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
प्रायव्हेट जेटचे भाडे किती?
Safe by Aviationनुसार, प्रायव्हेट जेटचे सरासरी भाडे तासाला सुमारे 3 लाख रुपये असते. हे भाडे विमानाचा आकार, प्रवासाचे अंतर आणि सुविधांनुसार ठरते.
भारतामध्ये प्रायव्हेट जेट सिस्टम कशी काम करते?
'हा निव्वळ अपघात, राजकारण करू नये' ; अजितदादांच्या निधनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
1) DGCAची परवानगी आवश्यक
प्रायव्हेट जेटचे परिचालन सुरू करण्यापूर्वी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडे नोंदणी करणे बंधनकारक असते. DGCAची परवानगी नसल्यास उड्डाण करता येत नाही.
2) सर्व सरकारी कर भरणे अनिवार्य
प्रायव्हेट जेटला कोणत्याही प्रकारची करसवलत दिली जात नाही. 2023 मधील एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानेही बाब स्पष्ट केली होती की, प्रायव्हेट जेटमुळे सर्वसामान्य नागरिकांचा थेट फायदा होत नसल्याने सवलत देण्याचा प्रश्नच येत नाही.
3) देखभाल आणि पार्किंग नियम
प्रायव्हेट जेटची देखभाल CAR-M आणि CAR-145 नियमांनुसार केली जाते. DGCAकडून पार्किंगची व्यवस्था होते आणि त्यासाठी मालकांना शुल्क भरावे लागते. यामागचा उद्देश उड्डाण सुरक्षितता सुनिश्चित करणे हा आहे.
4) ATC समन्वय व रूटमॅप
DGCAची परवानगी मिळाल्यानंतर जेटला ATC (एअर ट्रॅफिक कंट्रोल)शी जोडले जाते. उड्डाणापूर्वी संपूर्ण रूटमॅप सादर करावा लागतो. त्यानंतरच उड्डाणास मंजुरी दिली जाते.
5) परवाना असलेले पायलट व सुरक्षा तपासणी
प्रायव्हेट जेट केवळ अधिकृत परवाना असलेले पायलटच उडवू शकतात. पायलट्सची माहिती मालकांना देणे बंधनकारक असते. वेळोवेळी सुरक्षा तपासण्या केल्या जातात, जेणेकरून उड्डाणात कोणतीही अडचण येऊ नये.
Web Summary : India's private jet usage is soaring, driven by businesses and political figures. The market, valued at $274 million in 2024, is projected to double by 2029. Hourly charter rates average ₹3 lakh. Strict DGCA regulations govern operations, including permits, taxes, maintenance, and pilot licensing, ensuring safety.
Web Summary : भारत में प्राइवेट जेट का उपयोग बढ़ रहा है, जिसका कारण व्यवसायी और राजनेता हैं। 2024 में 274 मिलियन डॉलर का बाजार 2029 तक दोगुना होने का अनुमान है। प्रति घंटे चार्टर दरें औसतन ₹3 लाख हैं। डीजीसीए के सख्त नियम संचालन को नियंत्रित करते हैं, जिसमें परमिट, कर, रखरखाव और पायलट लाइसेंसिंग शामिल हैं, जिससे सुरक्षा सुनिश्चित होती है।