शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वीच घेतला होता राजीनाम्याचा निर्णय?, कारण विचारताच म्हणाले होते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 19:16 IST

अजित पवार यांनी आज तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिल्यानं राज्याच्या राजकारणात मोठा भूकंपच झाला आहे.

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आज तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिल्यानं राज्याच्या राजकारणात मोठा भूकंपच झाला आहे. परंतु, आमदारकी सोडण्याचा निर्णय अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वीच घेतला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. 

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, अजित पवार यांच्या राजीनाम्याबद्दल काही महत्त्वपूर्ण खुलासा केला. 'दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी आपल्याला फोन केला होता. तुम्ही कुठे आहात एवढंच त्यांनी विचारलं होतं. मी त्यावेळी औरंगाबादला होतो. त्यानंतर, आज संध्याकाळी ५.४० वाजता त्यांनी विधानभवनातील माझ्या दालनात सागर नावाच्या 'पीएस'कडे स्वतःच्या हस्ताक्षरातील राजीनामा सोपवला. मी फोनवर त्यांना कारण विचारलं असता, आत्ता काही सांगत नाही, फक्त राजीनामा मंजूर करा, एवढंच ते म्हणाले' असं हरिभाऊ बागडे यांनी नमूद केलं. त्यांनी दिलेल्या या माहितीमुळे अनेक नवे प्रश्न, शंका निर्माण झाल्या आहेत.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि अजित पवार यांचे काका शरद पवार आज दुपारी ईडी कार्यालयात जाणार होते. त्यामुळे सकाळपासूनच राष्ट्रवादीच्या नेत्यांची रीघ सिल्वर ओक बंगल्यावर लागली होती. त्यात अजित पवार कुठेच नव्हते. हा प्रश्न माध्यमांनी नेतेमंडळींना विचारला. त्यावर, अजितदादा त्यांच्या मतदारसंघात पूरग्रस्तांच्या मदतकार्यात सहभागी झाल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. स्वतः शरद पवार यांनी आपल्यासमोरच त्यांना तसा सल्ला दिल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं. परंतु, हे दावे कितपत खरे होते, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण, आज सकाळपासून अजित पवार मुंबईतच होते आणि संध्याकाळी त्यांनी राजीनामा दिल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं.

लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यावरून पवार कुटुंबात अंतर्गत कलह उद्भवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानंतर, पार्थ पवार यांचा पराभव होणं आणि रोहित पवार प्रकाशझोतात येणं, हे लक्षवेधी ठरलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर, अजित पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNCPराष्ट्रवादी काँग्रेस