शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट-पवार गट आमनेसामने; केंद्रीय निवडणूक आयोगात पुन्हा सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 15:24 IST

NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group: राष्ट्रवादी कोणाची? पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्ह कोणाचे? यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे.

NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांनी पक्षावर दावा केला. याप्रकरणी सध्या केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. २० नोव्हेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगात पुन्हा एकदा सुनावणी सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मागील निवडणुकीवेळी शरद पवार गटाने अजित पवार गटावर प्रतिज्ञापत्रांवरून मोठे आरोप केले होते. या सुनावणीसाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित राहू शकतात, असे सांगितले जात आहे. 

मागील सुनावणीवेळी अभिषेक मनु सिंघवी यांनी शरद पवार गटाची बाजू मांडली होती. मात्र, ते मुद्दे अजित पवार गटाने खोडून काढले होते. यानंतर आता पक्ष आणि पक्ष चिन्ह याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग दोन्ही गटाचे म्हणणे ऐकून घेणार आहे. या सुनावणीपूर्वी दिल्लीत शरद पवार गटाची एक बैठक होऊ शकते, अशी चर्चा आहे. ०२ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणी अजित पवार गटाने सलग सुनावणीबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग सलग सुनावणी घेऊ शकतो, असे म्हटले जात आहे. 

काही तांत्रिक गोष्टी आम्ही आयोगासमोर आणणार आहोत

अजित पवार गटाकडून सलग सुनावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. सुनावणीत काही तांत्रिक गोष्टी आम्ही आयोगासमोर आणणार आहोत, असे अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी म्हटले होते. निवडणूक आयोगापुढे ०२ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. त्यात अभिषेक मनु सिंघवी यांनी दोन तास युक्तिवाद केला. अजित पवार गटावर अनेक गंभीर आरोप केले. अजित पवार गटाकडून खोटी प्रतिज्ञापत्र दाखल केली असल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत अजित पवार यांच्याकडे काहीच समर्थन नसल्याचा दावाही करण्यात आला होता. 

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगात होणाऱ्या या सुनावणीसाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. सुनावणीच्या आधी दिल्लीत शरद पवार गटाची बैठक होण्याची शक्यता आहे. त्या बैठकीत रणनिती ठरवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार