शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 18:28 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळाल्याने विरोधी पक्षनेतेपदाची संधी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे.

आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधिमंडळ गटनेतेपदासाठी अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर अजित पवार यांच्या नावाची घोषणा जयंत पाटील यांनी केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, डी.पी.त्रिपाठी,  अजितदादा पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, पक्षाचे  सर्व नवनिर्वाचित आमदार आणि विधान परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019