शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'...म्हणजे अजित पवार यांचा फडणवीसांवर विश्वास नसेल', संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 13:27 IST

Ajit Pawar Death News: विलिनीकरणाचा विषय अजित पवार यांच्या मनात असता तर त्यांनी माझ्यासोबत चर्चा केली असती, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केला होता. त्यावरून आता संजय राऊत यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.     

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून दोन्ही गटांचे नेते वेगवेगळे दावे करत आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं विलिनीकरण व्हावं, ही अजित पवार यांची अखेरची इच्छा होती, असा भावूक दावा राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेत्यांकडून केला जात आहेत. याचदरम्यान, विलिनीकरणाचा विषय अजित पवार यांच्या मनात असता तर त्यांनी माझ्यासोबत चर्चा केली असती, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केला होता. त्यावरून आता संजय राऊत यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्यावरून संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रत्येक गोष्टीची चर्चा होतेच असं नाही. अजित पवार हे स्वत:च्या पक्षाचे नेते आणि प्रमुख होते. ते स्वत:च्या मर्जीने भाजपासोबत गेले होते. पुढे भाजपा हा आपल्या महाराष्ट्राच्या विचाराचा पक्ष नाही, असे त्यांना वाटले असावे. आता अजित पवार हे फडणवीसांबाबत खाजगीत बरंच काही बोलायचे, असा दावा आम्ही केला तर. अजित पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास नसेल म्हणून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली नसेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

जर अजित  पवार यांना स्वगृही जायचं असेल तर त्यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याची गरजच काय होती. फडणवीस यांचा पक्ष हा अखंड महाराष्ट्राच्या विरोधात आहे. फडणवीस यांचा पक्ष मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या बाजूने आहे, अशा वेळी अजित पवारांसारखा नेता या भूमिकेवर काम करू शकणार नाही, हे आम्हाला माहिती होतं. अजित पवार यांच्याशी आमच्याही चर्चा होत होता. आता अजित पवार यांनी विलिनिकरणाबाबत आपल्याशी चर्चा का केली नाही, याचं देवेंद्र फडणवीस यांनी आत्मचिंतन करावं, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस