शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

निव्वळ अपघात, यात राजकारण नाही, शरद पवार यांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 06:50 IST

Ajit Pawar Death News: मी आज मीडियासमोर येणार नव्हतो; पण, काही माध्यमांमध्ये अपघातामागे काही राजकारण आहे, अशा प्रकारची भूमिका कोलकातावरून मांडली गेली, असं कळलं. पण, यात राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.

बारामती - अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात होती अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणार नाही; पण, सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात. मी आज मीडियासमोर येणार नव्हतो; पण, काही माध्यमांमध्ये अपघातामागे काही राजकारण आहे, अशा प्रकारची भूमिका कोलकातावरून मांडली गेली, असं कळलं. पण, यात राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.

शरद पवार म्हणाले, या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया त्यात राजकारण आणू नये एवढंच सांगायचं आहे. ममता बॅनर्जी यांनी घातपाताची शक्यता व्यक्त करत सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीत चौकशीची मागणी केली होती, त्याला पवार यांनी उत्तर दिले.

याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की अपघात झाला आणि त्यात अजित पवारांसह इतरांचा मृत्यू झाला, पण मला याचे दुःख होत आहे की एखाद्या नेत्याच्या मृत्यूवरून संकुचित राजकारण केले जात आहे. मला याचेही दुःख आहे की ममता बॅनर्जी या निमित्ताने खालच्या पातळीचे राजकारण करत आहेत.

...अन् प्रत्येकाच्या अश्रूंचा बांध फुटलाउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. या घटनेनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबिय बारामतीत आले आहेत. अपघाताची माहिती समजताच खा. सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्या पत्नी खा. सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार हेलीकॉप्टरने बारामती विमानतळावर दाखल झाले. तिथे शरद पवार यांचे जुने सहकारी मित्र विठ्ठल शेठ मणियार होते त्यांना पाहून सुळे आणि पवार यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी त्यांची गळाभेट घेत दुःख व्यक्त केले. यावेळी सुळे यांनी, 'लाडला होता', असे म्हणत भावनांना वाट मोकळी केली. पवार कुटुंबियांचा विलाप पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विमानतळावर पोहोचताच या अपघाताची माहिती घेतली. यावेळी पवार हे भावुक झाले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : No politics in accident, Sharad Pawar clarifies on Ajit Pawar's death.

Web Summary : Sharad Pawar refuted political motives behind Ajit Pawar's accidental death. He urged against politicizing the tragedy, confirming it was purely an accident. Fadnavis condemned exploiting the death for politics, criticizing Banerjee's remarks. The Pawar family was devastated, mourning Ajit's loss in Baramati.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामतीSharad Pawarशरद पवार