शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चढ-उतारांनी भरलेले अजितदादांचे आयुष्य; मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न राहिले अपुरे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 16:40 IST

Ajit Pawar Baramati Plane Crash: अजितदादा काँग्रेस, शिवसेना आणि भाजपच्या नेतृत्वाखालील विविध सरकारांमध्ये सहावेळा उपमुख्यमंत्री राहिले.

Ajit Pawar Death in Plane Crash: राष्ट्रवादी काँग्रेस(अप) पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज(दि.28) सकाळी बारामती येथे विमान अपघातात दुःखद निधन झाले. या दुर्दैवी घटनेमुळे सहा वेळा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजितदादांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न मात्र अपुरे राहिले. अनेकवेळा त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छाही बोलून दाखवली होती.

कर्मठ आणि शिस्तप्रिय नेता

अजित पवार हे अत्यंत कर्मठ आणि वेळेचे काटेकोर पालन करणारे नेते म्हणून ओळखले जात. अनेक नेते किंवा सरकारी अधिकारी कार्यक्रमांना उशिरा पोहोचायचे, पण अजित पवार नेहमी वेळेतच कार्यक्रमठिकाणी हजर राहत. प्रशासनावर मजबुत पकड असलेल्या अजितदादांनी अधिकाऱ्यांच्या चांगल्या कामाची कौतुक केलेच, पण वेळप्रसंगी त्यांना फटकारले सुद्धा. काँग्रेस, शिवसेना आणि भाजपच्या नेतृत्वाखालील विविध सरकारांमध्ये उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

चढ-उतारांनी भरलेला राजकीय प्रवास

अजित पवारांचा राजकीय प्रवास नेहमीच चढ-उतारांनी भरलेला राहिला. कथित 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यापासून ते पुण्यातील त्यांच्या मुलगा पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहारांवरील वादांपर्यंत...अनेक प्रसंग त्यांनी पाहिले. तरीही प्रत्येकवेळी त्यांनी स्वतःला राजकीयदृष्ट्या सावरले. ‘दादा’ या प्रेमळ नावाने ओळखले जाणारे अजित पवार स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध होते. विशेषतः ग्रामीण भागातील सभांमध्ये ते थेट आणि रोखठोक भाषेत मत मांडत.

अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!

वादग्रस्त विधाने आणि माफी

2013 मध्ये पाणी आणि वीजटंचाईवर केलेल्या विधानांमुळे अजित पवार मोठ्या वादात सापडले होते. सोलापूरच्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी भैया देशमुख यांच्या उपोषणावर त्यांनी केलेली टिप्पणी तीव्र टीकेचा विषय ठरली होती. तसेच वीज खंडित होण्यावरून केलेल्या एका विधानावरही मोठा वाद झाला, ज्यामुळे त्यांना जाहीर माफी मागावी लागली.

2023 मध्ये काकांविरोधात बंड

जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक शरद पवार यांच्या विरोधात बंड पुकारत अजित पवारांनी पक्षाचे नाव, चिन्ह आणि बहुसंख्य आमदार आपल्या बाजूने वळवले. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्यानंतर, अवघ्या काही महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबतच्या युतीत 41 जागा जिंकून त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले.

सत्तेत भूमिका मजबूत

2024 च्या विधानसभा निवडणुकांनंतर अजित पवारांनी राज्याच्या राजकारणातील आपली पकड अधिक मजबूत केली. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसह युतीत असूनही, आपण विकासासाठी सत्तेत सहभागी झालो असून आपल्या प्रगतिशील विचारधारेपासून ढळलो नाही, असे ते सातत्याने सांगत होते. राजकीय चर्चांमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील कथित सत्तासंघर्षावर भर असतानाही अजित पवार आपली पक्षसंघटना आणि मंत्रालयांवर लक्ष केंद्रित करत होते.

1991 पासून बारामतीचा राजकीय किल्ला

22 जुलै 1959 रोजी आशा आणि अनंतराव पवार यांच्या पोटी जन्मलेल्या अजित पवारांनी 1982 मध्ये राजकारणात प्रवेश केला. 1991 मध्ये ते बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले आणि नंतर काका शरद पवार यांच्यासाठी ती जागा सोडली. त्यानंतर 1991 पासून सलग आठ वेळा ते बारामतीचे आमदार राहिले. अर्थ व नियोजन मंत्री म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 2026-17 चा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारीही त्यांच्यावर होती, मात्र त्यापूर्वीच त्यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's Life Full of Ups and Downs, CM Dream Unfulfilled

Web Summary : Ajit Pawar, NCP leader and Deputy CM, tragically died in a plane crash. A strict leader, his career saw controversies, political maneuvers, and a recent split from Sharad Pawar. Baramati MLA since 1991, his CM aspirations remained incomplete.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBaramatiबारामतीairplaneविमानAccidentअपघात