शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 21:02 IST

नितेश राणेंच्या दाव्याचा आता महायुतीत असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच जोरदार समाचार घेतला आहे.

Ajit Pawar Pune ( Marathi News ) : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघात प्रकरणानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही ऊत आला आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोपांची राळ उडवून देण्यात आल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनीही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. "अग्रवाल कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? अग्रवाल कुटुंबाने जे वकील दिले आहेत ते वकील शरद पवार यांचे निकटवर्तीय असल्याचे माहिती आम्हाला मिळाली आहे," असा दावा नितेश राणे यांनी केला होता. मात्र राणेंच्या या दाव्याचा आता महायुतीत असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच जोरदार समाचार घेतला आहे.

नितेश राणे यांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, "आज देशात हरीश साळवे हे प्रख्यात वकील आहेत. उद्या तुम्ही एखादे प्रकरण त्यांच्याकडे दिले, तर ते लगेच तुमचे वकील होणार नाहीत. उद्या आणखी दुसऱ्या कोणाची केस असेल तर ते तिकडे जाणार. सगळ्यांना मला हात जोडून सांगायचं आहे की, असं कोण कुठला वकील कोणाला देत नाही. बाबांनो, ही सगळी बकवास आहे. असे आरोप करून आपण या प्रकरणाची दिशा दुसरीकडेच घेऊन जात आहोत. जो  वकील दिलाय त्यालाच विचारा की, तुला कोणी नेमला? तुला कोणी केस लढवायला दिली? हे त्या वकिलालाच विचारा," अशा शब्दांत अजित पवार यांनी नितेश राणेंना घरचा अहेर दिला आहे.

आरोप करताना नितेश राणे नेमकं काय म्हणाले होते?

भाजप आमदार नितेश राणे यांनी शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. "नेहमी बोलणाऱ्या, प्रत्येक प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत? शरद पवार गटाकडून या प्रकरणावर प्रतिक्रिया का येत नाहीत? सुप्रिया सुळे आणि अग्रवाल कुटुंबाचे संबंध आहेत का? अग्रवाल कुटुंबाने जे वकील दिले आहेत ते वकील शरद पवार यांचे निकटवर्तीय असल्याची आमची माहिती आहे," असा आरोप नितेश राणेंनी केला होता.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNitesh Raneनीतेश राणे Sharad Pawarशरद पवारPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघात