शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांनी तातडीची बैठक बोलावली; आमदार येणार की दांडी मारणार? पराभवाने चलबिचल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 12:00 IST

Maharashtra Politics: अजित पवार गटाचा केवळ एकच खासदार निवडून आला असून ते स्वत:च्या मतदारसंघातून पत्नीलाही निवडून आणू शकलेले नाहीत. पुण्यात अजित पवारांचा चांगला प्रभाव आहे, तरीही आजुबाजुचे दोन मतदारसंघातही राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला आहे. 

लोकसभा निवडणुकीत महायुतीला तीन पक्षांमुळे घवघवीत यश मिळेल, उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि शरद पवारांचा पुतण्याच फोडला की विरोधकच राहणार नाही असा भाजपचा समज फोल ठरला आहे. यामुळे शिंदेंच्या पक्षात नाही परंतु अजित पवारांनी फोडलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांत कमालीची चलबिचल सुरु झाली आहे. अजित पवार गटाचा केवळ एकच खासदार निवडून आला असून ते स्वत:च्या मतदारसंघातून पत्नीलाही निवडून आणू शकलेले नाहीत. पुण्यात अजित पवारांचा चांगला प्रभाव आहे, तरीही आजुबाजुचे दोन मतदारसंघातही राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला आहे. 

अशातच पवारांनी दिल्लीला जाणे टाळले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवारांनी आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे धास्तावलेले आमदार जाणार की पाठ फिरविणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

राष्ट्रवादीच्या या बैठकीला सर्व आमदारांनी हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीच्या गोटातील आमदारांत अस्वस्थता असून हे आमदार त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी पुन्हा शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला केंद्रात एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यासाठी उद्या अजित पवार दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. 

अजित पवारांनी सुप्रिया सुळेंशी संपर्क साधल्याची चर्चाही राजकीय  वर्तुळात सुरु झाली आहे. तसेच आमदारांकडूनही सुळेंशी संपर्क केला जात असल्याचे सांगितले जात आहे. हे आमदार पुन्हा शरद पवारांच्या आश्रयाला जाऊन आमदारकी टिकविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे. आता बैठकीला किती आमदार उपस्थित राहतात, या बैठकीत काय सूर निघतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४