शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Video : 'अजितदादां'चे कौटुंबिक 'बर्थडे सेलिब्रेशन'; 'हा' खास क्षण ठरला कौतुकाचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 22:44 IST

खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ केला शेअर...

ठळक मुद्देदादांना दिलेल्या या कौटुंबिक शुभेच्छा कौतुकाचा विषय

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी आज वाढदिवस साजरा केला नाही. मात्र, दूरध्वनीद्वारे तसेच डिजिटल माध्यमातून आलेल्या शुभेच्छांचा त्यांनी आवर्जून स्विकार केला.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या भगिनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह इतर भगिनींनी त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. खासदार सुळे यांनी दादांचे ' बर्थडे सेलिब्रेशन ' हे खास क्षण सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत .त्यावर दादांचे चाहते, कार्यकर्ते यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे . उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आज अनेक मान्यवरांनी, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांनी, तसेच सर्वसामान्य जनतेनंही लेख,पत्र लिहून अजित दादांविषयी आदर, स्नेह, आपुलकी व्यक्त केली आहे. तसेच वाढदिवसानिमित्ताने आरोग्य शिबिरांचे आयोजन, वृक्षारोपण कार्यक्रम, गरजूंना मदतीसारखे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले .यामध्ये दादांना दिलेल्या या कौटुंबिक शुभेच्छा कौतुकाचा विषय ठरल्या .

 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचा दादा अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व बहिणींनी एकत्र येऊन शुभेच्छा दिल्या.सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे आम्ही सर्वजण एका ठिकाणी जमू शकलो नाही.त्यामुळे यावर्षी आम्ही व्हिडीओ कॉन्फरन्स चा आधार घेतला.

यावेळी माझ्यासोबत प्रफुल्ला भोसले, रजनी इंदूलकर,विजया पाटील,निमा माने, निता पाटील, शमा पवार आणि आश्विनी पवार होत्या.दादा पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असा संदेश खासदार सुळे यांनी पोस्ट केला आहे .

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसState Governmentराज्य सरकारSupriya Suleसुप्रिया सुळेdigitalडिजिटल