शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadanvis on Gopichand Padalkar Attack: पोलीस त्यांच्या बापाचे आहेत का?; देवेंद्र फडणवीस आक्रमक, पडळकरांच्या सुरक्षेसाठी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 13:46 IST

Ajit Pawar indisposed on Gopichand Padalkar's Statement: आज जे जात्यात आहेत, ते उद्या सुपात जाती, परिस्थिती बदलते, असा सूचक इशारा देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला. यावर तातडीने अजित पवारांनी उत्तर देत पडळकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. 

मुंडे साहेबांवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली. भुजबळांना दिली गेली. पण  गोपीचंद पडळकर संपला पाहिजे, अशा पद्धतीची वागणूक मिळत असेल तर त्यावर लक्ष घालावे. यामध्ये सरकारचा थेट संबंध आहे. पोलीस काय यांच्या बापाचे आहेत का? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच आज जे जात्यात आहेत, ते उद्या सुपात जाती, परिस्थिती बदलते, असा सूचक इशारा देखील विधानसभेत दिला. यावर तातडीने अजित पवारांनी उत्तर देत पडळकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. 

 विधान मंडळाच्या सदस्याचा जीव धोक्यात आहे. सरकारमधले विचारतात पोलीस सुरक्षा कशाला घेता. मला त्यांना विचारायचे आहे, पोलीस त्यांच्या बापाचे आहेत का? आम्हाला हा महाराष्ट्र ठेवायचा आहे, पश्चिम बंगाल करायचा नाहीय. एका आमदाराचा जीव जात असताना आम्ही शांत बसू शकत नाही. त्या पोलीस अधिकाऱ्यांवर बदली आणि दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी, आजचे कामकाज थांबवा आणि आम्हाला दालनाता बोलवा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर अजित पवारांनी फडणवीसांच्या आरोपांना प्रत्यूत्तर दिले.

प्रत्येक माणसाला संरक्षण देणे सरकारची जबाबदारी आहे. राज्यकर्ते कोणीही असले तरी त्यात दुमत नाही. मला राज्यातील जनता गेली तीस वर्षे ओळखते. तरी काहीजण बोलतात की अजित पवारकडे जबाबदारी दिली तर तो चार दिवसांत राज्य विकून खाईल, अरे काय बोलता? अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. 

मी कोणाच्या अध्यात मध्यात नसतो, फक्त कोणाही पक्षाचा नेता, कार्यकर्ता आला तर विकासाच्या कामांमध्ये लक्ष घालतो. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी विधानसभेत, परिषदेत लोकांचे प्रतिनिधी म्हणून पाठवलं जातं, तेव्हा तारतम्य ठेवून वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. फडणवीसांनी मुंडे साहेबांचे उदाहरण दिले, पवार साहेबांची भूमिका माहिती आहेच. संरक्षण देण्याची भूमिका आहेच. शंभुराज देसाईंशी त्यावर बोललो आहे. फडणवीसांनी आता अधिकची माहिती दिली आहे, त्यावरून योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारGopichand Padalkarगोपीचंद पडळकरvidhan sabhaविधानसभा