शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अजित पवारांच्या घरावर धाडी, सुप्रिया सेफ; हे कसं काय? राज यांच्या आरोपांवर पवार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 14:16 IST

अजित पवार आणि त्यांच्या सख्ख्या बहिणींच्या घरावर धाडी पडतात, पण सुप्रिया सुळेंच्या घरावर धाड पडत नाही; राज ठाकरेंच्या विधानाला पवारांचं थेट उत्तर

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घरावर, त्यांच्या सख्ख्या बहिणींच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी पडतात. पण सुप्रिया सुळेंच्या घरावर छापे पडत नाहीत, असं का, असा प्रश्न मनसे प्रमुख राज ठाकरेंनी ठाण्यात झालेल्या सभेत उपस्थित केला. शरद पवार स्वत:च्या मुलीला वाचवतात आणि पुतण्याला अडकवतात, असा राज यांच्या विधानाचा रोख होता. राज यांच्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अजित पवार कोणी तिसरे आहेत का?अजित पवारांच्या घरी, त्यांच्या सख्ख्या बहिणींच्या घरांवर धाडी पडतात. पण सुप्रिया सुळेंच्या घरांवर धाडी पडत नाहीत, यामागचं कारण काय, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. त्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, राज यांचा हा आरोप राजकीय नव्हे, तर वैयक्तिक स्वरुपाचा असल्याचं पवार म्हणाले. 

अजित पवारांच्या घरावर छापे पडतात. पण सुप्रिया सुळेंच्या घरावर पडत नाहीत. असं का होतं? हा काय प्रश्न आहे का? असा प्रतिप्रश्न शरद पवारांनी केला. धाडी कोणाकडे पडणार ते आम्ही ठरवतो का? असा प्रश्न पवारांनी विचारला. अजित पवार कोणी तिसरे आहेत का? अजित आणि सुप्रिया ही भावंडं आहेत. त्यामुळे त्यांच्यावर राज यांनी केलेला आरोप वैयक्तिक स्वरुपाचा आहे, तो राजकीय नाही, असं पवारांनी म्हटलं.

जातीयवाद वाढवल्याच्या आरोपाला उत्तरराष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात जातीयवाद वाढल्याचा आरोप राज ठाकरेंनी काल पुन्हा केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर संभाजी बिग्रेडसारख्या संस्था निर्माण झाल्या. हा निव्वळ योगायोग नाही, असं राज म्हणाले. त्यावर राष्ट्रवादीचा इतिहास तपासून पाहा. विविध जातीच्या लोकांना सोबत घेऊन पुढे जाणारा हा पक्ष आहे. धनंजय मुंडे, छगन भुजबळ, मधुकर पिचड या नेत्यांनी पक्षात महत्त्वाची पदं भूषवली आहेत, असं पवारांनी सांगितलं.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारRaj Thackerayराज ठाकरेSupriya Suleसुप्रिया सुळे